डिसले गुरुजींचा सत्कार कोणत्या आधारावर

डिसले गुरुजींचा सत्कार कोणत्या आधारावर

Published on
डिसले गुरुजींचा सत्कार कोणत्या आधारावर राज भवन, मुख्यमंत्री कार्यालय आणि शिक्षण विभागाकडे माहितीच नाही मुंबई, ता. २२ : बार्शी तालुक्यातील शिक्षक रणजित सिंह डिसले यांचा जागितक शिक्षण पुरस्कार विजेते म्हणून मोठा गाजावाजा झाला. मात्र या पुरस्काराचे प्रकरण वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डिसले यांना पुरस्कार मिळाला म्हणून राज भवन ते मुख्यमंत्री कार्यालय, शालेय शिक्षण आणि विविध मंत्री सरकारने केलेला त्यांचा सत्कार कोणत्याही आधारावर वा अधिकृत माहितीवर करण्यात आला नव्हता. याची कबुली सरकारी यंत्रणांनी माहिती अधिकारात दिल्याने डिसले यांनी सर्व विभागाला तोंडघशी पाडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, डिसले यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी डिसले यांच्या सत्काराबाबत माहिती मागवली होती. त्यावर बहुतांश विभागाने यासाठीची माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगितले असून राज भवन सचिव कार्यालयानेही आपल्याकडे माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे. डिसले गुरुजी यांना मिळालेला पुरस्कार त्याबाबत कोणतीच त्यांनी सरकारकडे आणि विशेषतः शालेय शिक्षण विभागालाही आजतागायत दिली नाही. त्यामुळे ही माहिती सरकारकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर आपल्याला मिळाले असावे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी दिली. डिसले यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, या पुरस्काराची पडताळणी सत्यता शालेय शिक्षण विभागाने तपासली नाही, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. डिसले हे बार्शी तालुक्यातील वेळापूर येथे प्रतिनियुक्तीवर असताना त्यांनी शिक्षण विभागाला न कळवता परदेशात गेले. खासगी कामे केली. शिवाय त्या कालावधीतील शिक्षण विभागाकडून वेतनही घेतले, त्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता, असा दावाही काटकर यांनी केला. डिसले यांनी परदेशातील प्रवास यासाठी परवानगी का घेतली नव्हती, ही बाबही समोर आली असल्याने या प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी स्थानिक शिक्षक अनिल देशपांडे यांनी केली; तर यासंदर्भात डिसले यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. ... शिक्षण विभागाच्या तपासात पितळ उघडे डिसले यांनी शाळेत मागील चार वर्षांत कोणत्याही अध्यापनाचे कार्य केलेले नाही. त्यासाठी त्यांनी ‘डाएट’मध्ये प्रतिनियुक्ती घेतली. आणि ज्या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर होते, त्या ठिकाणीही अनेकदा विभागाला न कळवता गैरहजेरी लावली होती. शिवाय परदेशात प्रवास करण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी घेतली नव्हती. विभागाची फसवणूक करीत या काळातील वेतनही घेतले. हे सगळे झाकून राहावे म्हणून त्यांनी वेळोवेळी शिक्षण विभागावर दबाव आणला, आदी बाबी नुकत्याच झालेल्या एका तपासात समोर आल्या आहेत. त्यामुळे डिसले यांचे वेतन रोखण्यात आले होते, हेही आता समोर आले आहे. ... शिक्षणमंत्र्यांकडून पाठराखण डिसले यांनी त्यांचे पितळ उघडे पडत असल्याने आता परदेशात पाठ्यवृत्तीसाठी जाण्याचे कारण पुढे केले. त्यातही भरपगारी रजा हवी, अशी मागणी केली आहे. त्याला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठबळ दिल्याने त्याही या वादात अडकण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com