
ठाणे जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली ; मात्र, मृत्यू वाढले
ठाणे : ठाणे जिल्ह्यात (Thane) जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत घट झाली आहे. असे असले, तरी दुसरीकडे मात्र या आजाराने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांत जिल्ह्यात ५८ जणांचा कोरोनाने मृत्यू (corona deaths) झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची वाढती संख्या, त्या वेळी अपुऱ्या पडलेल्या खाटा, ऑक्सिजन यांमुळे मृत्युदरातदेखील वाढ झाली होती; तर अनेक रुग्णांची रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी धडपड करावी लागली होती.
हेही वाचा: पालघर : भादवे येथे अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
या सर्व गोष्टींचा विचार करता, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने योग्य नियोजन केले होते; मात्र तिसऱ्या लाटेत आढळून येणाऱ्या रुग्णांना सौम्य लक्षणे होती. सुरुवातीला रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील नाममात्र होती. तिसरी लाट ही भयावह नाही. असा समज सर्वत्र झाला आहे. मात्र मागील १० दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
१४ जानेवारी ते २३ जानेवारी या दहा दिवसांच्या कालावधीत ५८ जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. तारीख मृत्युसंख्या १४ जानेवारी ०४ १५ जानेवारी ०३ १६ जानेवारी ०४ १७ जानेवारी ०६ १८ जानेवारी ०६ १९ जानेवारी ०८ २० जानेवारी ०८ २१ जानेवारी १० २२ जानेवारी १२ २३ जानेवारी ०५
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..