अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

sakal_logo
By
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : विरारमध्ये टेम्पो आणि मोटारसायकलच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. विरार पूर्वेकडील शिरसाड ते अंबाडी वज्रेश्वरी रोडवरील मेढा फाटा येथे आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. धीरज शेलार (वय ३०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून तो भिवंडीच्या दुगाड गावाचा रहिवासी आहे. भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने हा अपघात घडला. मांडवी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. विरार पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top