एकाच रात्रीत चार बैल चोरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच रात्रीत चार बैल चोरले
एकाच रात्रीत चार बैल चोरले

एकाच रात्रीत चार बैल चोरले

sakal_logo
By
एका रात्रीत चार बैल चोरले वाडा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील वंगणपाडा, उंबरपाडा (मांगरूळ) येथील शेतकऱ्यांचे चार बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी वाडा पोलिसात आज तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मांगरूळ हा अतिदुर्गम भाग असून येथील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. देवराम कोरडे, सोमा शेंडे, अंजना शेंडे (रा. वंगणपाडा) व नवसू दिघे (रा. उंबरपाडा, मांगरूळ) यांचे प्रत्येकी एक बैल गेल्या सोमवारी (ता. १७) चोरीला गेले आहेत. त्यांनी शोध घेऊनही त्यांना सापडले नाहीत. अधिक माहिती घेतली असता सोमवारच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका पिकअपमध्ये बैल भरून नेले असल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. याप्रकरणी आज तक्रार दाखल केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top