कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर |corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona update
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद; वाचा सविस्तर

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. त्या तुलनेत तिसरी लाट नियंत्रणात राहिली आहे. तिसऱ्या लाटेतील (corona third wave) १५ दिवसांत १ ते २० वयोगटातील दहा मुलांच्या मृत्यूची (child death) नोंद झाली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेचे स्वरूप अधिक भयावह होते. दुसऱ्या लाटेत ११ ते १७ एप्रिल २०२१ दरम्यान एक वर्षे वयोगटाच्या आतील १७, १ ते १० वयोगटातील १३ तर ११ ते २० वयोगटातील १७ मुलांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: "मुंबईतील रखडलेले प्रकल्प आधी मार्गी लावा"

१८ ते २४ एप्रिलदरम्यान १ च्या आतील वयोगटातील १८, १ ते १० वयोगटातील १३ तर ११ ते २० वयोगटातील २२ मुलांचा मृत्यू झाला. २५ एप्रिल ते १ मे दरम्यान १ वयोगटाच्या आतील १२, १ ते १० वयोगटातील १२ आणि ११ ते २० वयोगटातील २३ मुलांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेमध्ये एकूण १४७ मुलांचा मृत्यू झाला. मुंबईत तिसरी लाट २१ डिसेंबरपासून आल्याचे सांगितले जाते. यादरम्यान २७ डिसेंबर २०२१ ते १६ जानेवारी २०२२ दरम्यान १ वयोगटाच्या आतील एकाही मुलाचा मृत्यू झाला नाही.

१ ते १० वयोगटातील ४ मुलांचा, तर ११ ते २० वयोगटातील ६ मुलांचा मृत्यू झाला. तिसरी लाट ऐन भरात असताना १० लहान मुलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी ६ डिसेंबर २०२१ ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान एकाही लहान मुलाच्या मृत्यूंची नोंद झाली नाही. मात्र इतर वयोगटातील रुग्णांचा विचार केला तर एकूण १५७ मृत्यूंची नोंद झाली. दुसरी लाट ऐन भरात असताना ११ एप्रिल ते १ मे दरम्यान एकूण २५,७८७ मृत्यूंची नोंद झाली.

कोरोना लाट ऐन भरात असताना लहान मुलांच्या झालेल्या मृत्यूंची तुलना करता येणार नाही. त्यासाठी संपूर्ण लाटेचा परिणाम बघावा लागेल. मात्र कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याचे दिसते.

- डॉ. अविनाश सुपे, प्रमुख, राज्य मृत्यू परीक्षण समिती.

दुसऱ्या लाटेतील मृत्यू ११ ते १७ एप्रिल २०२१ दरम्यान एक वर्षे वयोगटाच्या आतील १७ १ ते १० वयोगटातील १३ ११ ते २० वयोगटातील १७ ..१८ ते २४ एप्रिल २०२१ दरम्यान एक वर्षे वयोगटाच्या आतील १८ १ ते १० वयोगटातील १३ ११ ते २० वयोगटातील २२ ... २५ एप्रिल ते १ मे २०२१ दरम्यान एक वर्षे वयोगटाच्या आतील १२ १ ते १० वयोगटातील १२ ११ ते २० वयोगटातील २३ ... एकूण १४७ मुलांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronavirusdeathchildren
go to top