गौ शाळेला सिडकोची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौ शाळेला सिडकोची नोटीस
गौ शाळेला सिडकोची नोटीस

गौ शाळेला सिडकोची नोटीस

sakal_logo
By
गौ शाळेला सिडकोची नोटीस दहा दिवसांत जागा खाली करण्याचे आदेश पनवेल, ता. ३१ (प्रतिनिधी) ः महापालिका क्षेत्रातील आसूडगाव परिसरातील सिडको भूखंडावर असलेल्या एका गोशाळेस सिडकोने नोटीस पाठवली आहे. २० वर्षांपासून सुरू असलेली गौशाळा १० दिवसात खाली करण्याचे आदेश नोटिसीद्वारे देण्यात आल्‍याने गाईंना घेऊन जायचे कुठे, असा प्रश्‍न गौसेवकांना पडला आहे. आसूडगाव येथील गौशाळेत रस्त्यावर भटकणाऱ्या, ज्यांना गाय पाळणे अवघड झाले आहे अशा, अपघातग्रस्त, आजारी अशा जवळपास ४०० ते ५०० गायीचा सांभाळ केला जातो. सिडकोच्या मालकीच्या या भूखंडावरील गौशाळा १० दिवसात खाली न केली गेल्यास कारवाई केली जाणार आहे. अचानक आलेल्या नोटिसीमुळे हवालदिल झालेल्या गौसेवकांकडून पर्यायी भूखंड देण्याची मागणी सिडकोकडे पत्राद्वारे केली आहे. आसूड गाव येथील गौशाळा एका सामाजिक संस्थेकडून अनेक वर्षांपासून चालवली जात असून, दररोज शेकडो गौप्रेमी गौशाळेला भेट देत असून अन्नदान करतात. सिडकोने दिलेल्या नोटिसीमुळे गौशाळेतील ४०० गायींना घेऊन जायचे कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सिडकोकडून पर्यायी भूखंड उपलब्‍ध करण्यात येईल, अशी अशा आहे. - वनिता रवरिया, गौसेवक, गोवर्धन गौशाळा

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top