पाणथळ दिनानिमित्त एनएमईपीएस संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणथळ दिनानिमित्त एनएमईपीएस संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
पाणथळ दिनानिमित्त एनएमईपीएस संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

पाणथळ दिनानिमित्त एनएमईपीएस संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By
पाणथळ दिनानिमित्त पर्यावरण जागृतीवर भर विविध स्‍पर्धांमध्ये नवी मुंबईतील १,१०० विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नवी मुंबई, ता. ३१ : जागतिक पाणथळ दिनानिमित्ताने एनएमईपीएस (नवी मुंबई एनव्हार्नमेंट प्रीझर्व्हेशन सोसायटी) या संस्थेतर्फे ‘वर्ल्ड वेटलॅंड डे सेमिनार २०२१’चे ऑनलाईन व्हर्च्युअल प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. सेमिनारमध्ये नवी मुंबईतील विविध शाळांचे सुमारे एक हजार १०० विद्यार्थी, पर्यावरणवादी संस्थांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कांदळवने वाचवण्यासाठी मोठा लढा उभारण्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. या प्रसंगी पाणथळ संबंधी विषयांवर आयोजित स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आले.     विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा झपाट्याने नाश करत आहोत. या ऱ्हासाचा नेमका परिणाम काय होईल, याची जाणीव आपल्याला नाही. पुढच्या पिढीपर्यंत पर्यावरण समस्या पोहोचल्या पाहिजेत. हे आमच्या वार्षिक सेमिनारचे उद्दिष्ट होते. उत्तम भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने उचललेले हे लहान पाऊल म्हणावे लागेल, असे एनएमईपीएसचे अध्यक्ष व्ही. के. गांधी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. वनशक्‍ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन दयानंद हे सेमिनारचे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले, ‘पर्यावरण नुकसानीबाबत नवयुवकांनी सजग असले पाहिजे, त्यांनी पालकांच्या संमतीने याविषयी आवाज बुलंद करण्याची आवश्यकता आहे. आगामी पिढ्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ सुखकर करायचा असल्यास पर्यावरण ऱ्हासाला वेळीच आवर घातला पाहिजे. त्याकरिता खोलवर सहभागी महत्त्वाचा ठरतो. नवी मुंबईला फ्लेमिंगोचे शहर म्हणून ओळख मिळावी ही मूळ संकल्पना अनेक पर्यावरणवादी संस्थांनी मांडली आहे. शहरातील पाणथळ प्रदेशाला फ्लेमिंगो परिसर म्हणून सुरक्षित तसेच संवर्धित केले पाहिजे. अधिकारी वर्गाने चालून-फिरून परिसराचा वेध घेणे गरजेचे असल्याचे मत नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मांडले. ---------------------------------- विद्यार्थ्यांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग वक्तृत्व स्पर्धेत खासगी तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी पाणथळ आणि कांदळवन विषयावरील कल्पना मांडल्या. अंतिम फेरी तसेच स्पर्धेत इंग्रजी माध्यमात डीपीएस नेरूळचा आयुष तिवारी, हिंदीकरिता डीपीएस पनवेलची दक्षता देशमुख आणि मराठी भाषेत नवी मुंबई पालिका शाळा क्रमांक ४२ च्या जागृती सूर्यवंशीने बाजी मारली. सनशाईन स्कूल अँड स्किल्स अॅण्ड ॲबिलिटी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हीडिओ कोलाजच्या माध्यमातून सहभागीदारांना प्रदर्शित केले. विशेष बालकांच्या शाळांनी सादर केलेल्या व्हीडिओंचे अतिशय कौतुक करण्यात आले. ---------------------------------- युवा दलाची घोषणा ‘टेरी’ आणि ‘एनएमईपीएस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक पर्यावरण प्रश्नमंजूषेत डीपीएस नेरूळचा यश आर्या आणि डीएव्ही स्कूल नेरूळची कनिषा रावत अनुक्रमे विजेता आणि उपविजेती ठरले. यावेळी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर ‘वेट वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यात डीपीएस पनवेलची सिद्धी यादव विजेती ठरली. या कार्यक्रमात ‘बर्डस् ऑफ वेटलँडस्’ ही व्हीडिओ डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. त्यातील सतीश डबराल यांच्या छायाचित्रांना विशुद्धी गुप्ताच्या काव्यमय आवाजाची जोड लाभली होती. तसेच एनएमईपीएसतर्फे युवा दलाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top