चारकोप विद्यालयात एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारकोप विद्यालयात एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली
चारकोप विद्यालयात एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली

चारकोप विद्यालयात एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली

sakal_logo
By
चारकोप विद्यालयात एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली कांदिवली, ता. ३१ (बातमीदार) ः रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे १७ जानेवारीला कोल्हापूर येथे निधन झाले. चारकोप येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयात व ज्ञानवर्धिनी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २७ जानेवारीला शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी शोकसभेचे प्रास्ताविक करून एन. डी. सरांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. स्थानिक नगरसेवक दीपक तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना एन. डी. सरांचा विचार पुढे नेण्याचे आवाहन दोन्ही विद्यालयांना केले. तसेच शाळांना सहकार्याचे आश्वासन दिले. महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आमदार योगेश सागर यांनी शोकसंदेशामार्फत श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी जयवंत पिसाळ, सूर्यकांत आजगावकर, मोतीराम मुळीक, पोपटराव मांढरे, नामदेवराव नलवडे, उमाकांत जगताप, विलास जगताप, धनसिंग हजारे आदी उपस्थित होते. ...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top