Fri, May 20, 2022

झुलत्या पुलासाठी २० लाख मंजूर करणार
झुलत्या पुलासाठी २० लाख मंजूर करणार
Published on : 31 January 2022, 12:27 pm
झुलत्या पुलासाठी २० लाख मंजूर करणार
ॲड. आस्वाद पाटील यांची ग्वाही
पोलादपूर, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील असंख्य पाणी योजनांचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र, तरीही बोरावळेच्या पाणी योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देत शेकापने भूमिपूजनाचा कार्यक्रम केला. याचप्रमाणे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या घागरकोंडच्या झुलत्या पुलासाठीही २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांनी येथे दिली.
पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बोरावळे येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ ॲड.आस्वाद पाटील यांच्या हस्ते देवळे राजिप गटाच्या सदस्या सुमन कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तालुक्यातील विकासकामे करणाऱ्या शेकापसोबत नागरिकांनीही ठाम राहिल्यास गावागावांचा विकास होईल, असा विश्र्वास ॲड.पाटील यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काळात आम्ही असू अथवा एकनाथ गायकवाडसारखे नवीन सदस्यही सभागृहामध्ये असतील, तर कामे होत राहतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, रानवडीचे निवृत्ती उतेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्मणबुवा खेडेकर यांनी विचार मांडले. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे तसेच बांधकाम विभागाचे अभियंता, पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, शेकाप तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड, बोरावळे सरपंच वैभव चांदे, माजी सरपंच निवृत्ती उतेकर, चंद्रकांत सणस, योगेश महाडीक, समीर चिपळूणकर, बापू जाधव, बबन साने, अजित कंक, यासिन करबेलकर, तसेच पाणीपुरवठा कमिटी अध्यक्ष रामचंद्र मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..