माजी नगरसेवकावर मोक्का अंतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest
माजी नगरसेवकावर मोक्का अंतर्गत कारवाई

माजी नगरसेवकावर मोक्का अंतर्गत कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा डोंबिवली, ता. ३१ : भाजपचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यांसह ८ गंभीर गुन्हे दाखल असल्याने राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून परवानगी मिळताच ही कारवाई करण्यात आली. कल्याणच्या विशेष मोक्का न्यायालयाने त्याला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (Dombivli ex corporator booked under mcoca act)

सचिन खेमा याने कल्याणमधील भूषण जाधव याला शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांबरोबर फिरतो, म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याची घटना ३ जानेवारीला रात्री घडली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात सचिन याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यानंतर हा गुन्हा मागे घेण्यासाठी सचिन याच्या सांगण्यावरून भूषण याचा मित्र व व्यापाऱ्याला धंदा चालू ठेवण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी व भूषण याला तक्रार मागे घेण्यास सांग, अशी धमकी दिली होती. ते पोलिसांत तक्रार दाखल करण्यास निघाला असता सचिन याचा भाऊ नितीन याने साथीदारांसोबत दोघांना मारहाण केली होती. यामुळे सचिन याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते.

या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी खेमासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, त्याच्यावरील गुन्हे आणि वाढती गुन्हेगारी पाहता मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली होती. यासंदर्भात पोलिस महासंचालकांनी अहवालाला मंजुरी देताच सचिन याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकट अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न खेमाच्या सुटकेसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरू होते. खेमा यासह अन्य दोन नगरसेवकांना सत्ताधारी शिवसेनेने जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप करीत भाजपने राज्य सरकारविरोधात अप्पर पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता; परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे कारण पुढे करीत मोर्चा रद्द करण्यात आला. त्यानंतर खेमाविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘दे धक्का’ आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला ‘दे धक्का’ असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeDombivli
go to top