अल्पवयीनाकडून कार चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीनाकडून कार चोरी
अल्पवयीनाकडून कार चोरी

अल्पवयीनाकडून कार चोरी

sakal_logo
By
अल्पवयीनकडून कार चोरी भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : कल्याणमध्ये जाण्यासाठी अल्पवयीन मुलाने ऑनलाईन टॅक्सी बुक केली होती. वाटेत लघुशंका झाल्याचे सांगताच चालकाने कार थांबविली. चालकही कारमधून उतरल्याचे पाहताच त्या मुलाने चालकाला ढकलून कार पळवून नेली होती. पोलिस तक्रारीनंतर २४ तासांत या मुलाला ताब्यात घेण्यात आले. घणसोली येथे राहणारे नितीन पडवळ हे कार चालवून उदरनिर्वाह करतात. रविवारी (ता. ३०) पहाटे ठाणे शहरातील जांभळी नाका येथून कल्याणमध्ये जाण्यासाठी एका प्रवाशाने टॅक्सी बुक केली होती. भिवंडीजवळील पिंपळास फाटा येथे कार येताच प्रवाशाने लघुशंका आल्याचे सांगत कार थांबविण्यास भाग पाडले. पडवळ हे सुद्धा कारमधून उतरल्याचे पाहताच प्रवाशाने त्यांना जोरात धक्का देत ढकलून दिले. या संधीचा फायदा उचलत कार आणि मोबाईल घेऊन पसार झाला. जखमी अवस्थेतील पडवळ यांनी भिवंडी कोनगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक गणपत पिंपळे यांनी गुन्हा दाखल करत मोबाईल लोकेशनद्वारे तपास करत अल्पवयीन मुलाला कार, मोबाईलसह खारेगाव सर्कल, कळवा येथून ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top