मुंबईत रुग्णांसह मृत्यूमध्ये घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत रुग्णांसह मृत्यूमध्ये घट
मुंबईत रुग्णांसह मृत्यूमध्ये घट

मुंबईत रुग्णांसह मृत्यूमध्ये घट

sakal_logo
By
मुंबईत रुग्णांसह मृत्यूमध्ये घट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : मुंबईतील बाधित रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ती मंगळवारी ८०३ पर्यंत खाली आली. रुग्णसंख्येसोबत नागरिक बाधित होण्याच्या दरातही आणखी घट होऊन तो १.५ टक्क्यापर्यंत खाली आला. मंगळवारी रुग्णांपैकी ६५० (८१ टक्के) रुग्ण लक्षणेविरहित आहेत. नव्या रुग्णांपैकी १५२ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाधितांचा एकूण आकडा १०,४७,३९३ लाखांच्या पार आहे. आज १,८०० रुग्ण कोरोनातून बरे झाले. आजवर १०,१९,०८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर पोचला आहे. बाधितांपैकी ३१ रुग्णांना ऑक्सिजन खाटांवर दाखल करण्यात आले आहे. आजवर ८९७ रुग्णांना ऑक्सिजन खाटांवर उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. बाधितांपैकी ७,३३,२७४ रुग्ण लक्षणविरहित आहेत. एकूण उपलब्ध खाटांपैकी ५.४ टक्के खाटा भरल्या आहेत. रुग्णवाढीचा दर सोमवारच्या तुलनेत कमी होऊन ०.१४ टक्क्यांपर्यंत खाली आला; तर रुग्णदुपटीचा दरही ४८५ दिवसांपर्यंत वाढला आहे. उपचाराधीन रुग्णांचा आकडाही कमी होऊन ८,८८८ पर्यंत खाली आला. मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top