लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक

सकाळ  वृत्तसेवा मुंबई, ता. ५ : गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी खालावली. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा व्हेंटिलेटरवर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी पत्रकारांना दिली. मंगेशकर यांची प्रतिकार क्षमता कमी झाली आहे. काही उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नसल्याचे डॉ. समदानी यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना सुरुवातीपासूनच अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती शनिवारी सकाळी पुन्हा खालावली. त्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर  लक्ष ठेवून आहे. लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. तपासणीअंती त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू करण्यात आले. २२ जानेवारी रोजी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com