पनवेल गुन्हे वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेल गुन्हे वार्ता
पनवेल गुन्हे वार्ता

पनवेल गुन्हे वार्ता

sakal_logo
By

पनवेल गुन्हे वार्ता

चहाचे पैसे मागितल्याने मारहाण
पनवेल, ता. १३ (प्रतिनिधी) : चहाचे पैसे मागितले म्हणून लाथा-बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करत दुकानातील सामानाची तोडफोड केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे सेक्टर १७ येथे सचिन वरंडे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानात दोन व्यक्ती चहा पिण्यासाठी आले होते. त्यापैकी एकाकडे चहाचे पैसे मागितले असता त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काऊंटरवर ठेवलेले दोन चहाचे थर्मास जमिनीवर फेकत दुकानात प्रवेश केला. त्यानंतर सचिन आणि तेथे काम करत असलेल्या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकून तोडफोड केली. या प्रकारानंतर ते दोघेही पळून गेले.

सव्वाबारा लाख रुपयांच्या औषधांची चोरी
पनवेल, ता. १३ (प्रतिनिधी) : आर्थिक फायद्यासाठी कामगारानेच १२ लाख २४ हजार रुपयांच्या औषधांची चोरी केल्याप्रकरणी कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश कुमार चौधरी यांचा औषधे विकण्याचा कुबेर फर्मान सर्जिकल नावाने सेक्टर २१, कामोठे येथे दुकान आहे. त्यासाठी त्यांनी पाच मुले कामावर ठेवलेले आहेत. ते गावी राजस्थानला गेले असताना नथुराम चौधरी याला ग्राहकांच्या मागणीप्रमाणे औषधे पोहोच करण्यास सांगितले. तो ग्राहकांकडून पैसे घेऊन बँकेत जमा करत होता. त्यानंतर सुरेश कुमार यांचा अपघात झाल्याने ते बरेच दिवस दुकानांमध्ये गेले नाही. काही दिवसांनी त्यांनी दुकानातील माल व बँक अकाऊंटमधील रक्कम आणि उधारी या सर्वांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न केला असता १२ लाख २४ हजार २५१ रुपयांची तफावत आढळून आली. त्यामध्ये सहा लाख ६३ हजार रुपये रकमेचे औषधे चोरीस गेल्याचे आणि पाच लाख ६० हजार रुपयांची औषधे नथुरामने चोरून २८ ग्राहकांना १० ते १५ टक्के सवलतीने विक्री केली. याप्रकरणी नथुरामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेअरहाऊसचे शटर उचकटून चोरी
उरण, ता. १३ (वार्ताहर) : तालुक्यातील धुतूम गावाजवळ असलेल्या ऑल इंडिया वेअरहाऊसचे शटर उचकटून चोरट्यांनी १२ लाख ५९ किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुतूम गावाजवळ या गोदामात जनरल कार्गो साठवला जातो. चोरांनी या गोदामातील ९ लाख १५ हजार किमतीचे डेकोर होम फॅब्रिकचे ९७ रोल, कम्फर्ट कंपनीचे २५ हजार ८३० रुपयांचे २०० नग टॉवेल, एक लाख ५१ हजार किमतीचे ३५ ट्रॉली बॅग, ७६ हजार किमतीचे १०८ लॅपटॉप बॅग, १० हजार किमतीचे २४० कार्टून असा एकूण १२ लाख ५९ हजार किमतीचे माल चोरून नेला आहे. याबाबत चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top