
आर. जे. कॉलेजमध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) : रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात शनिवारी स्व. अभिराजी इंद्रदेवसिंग गीत गायन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पारितोषिक रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाच्या श्रद्धा पाल, द्वितीय पारितोषिक गुरू नानक महाविद्यालयाच्या वैष्णवी सूद, तृतीय पारितोषिक इंदाला महाविद्यालयाच्या सोजी सी. मॅथ्यू आणि प्रोत्साहन पुरस्कार भवन्स महाविद्यालयाच्या अनन्या हलर्णकर यांना मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, शास्त्रीय संगीत गायिका प्रा. डॉ. भारती सानप यांनी सूर-सरगमचे बारकावे समजावून सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संगीत शिक्षक राजेश कुमार सिंह आणि संगीत दिग्दर्शक संजय विजय सिंह यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हिमांशू दावडा, उपप्राचार्य डॉ. स्नेहा देऊस्कर आणि प्राध्यापक डॉ. संजय सिंह, सीमा सिंह आणि शिल्पा मिश्रा उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..