२२६ मुंबईकर ओमिक्रॉनबाधित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२६ मुंबईकर ओमिक्रॉनबाधित
२२६ मुंबईकर ओमिक्रॉनबाधित

२२६ मुंबईकर ओमिक्रॉनबाधित

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : मुंबईत एकेकाळी कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा दबदबा होता; पण आता त्याची जागा ओमिक्रॉनने घेतली आहे. पालिकेच्या ९ व्या जीनोम अहवालात २२६ कोविड रुग्णांच्या नमुन्यात ओमिक्रॉन आढळला आहे. २८५ कोविड रुग्णांचे नमुने कस्तुरबा येथील जीनोम सिक्वेन्सिंग लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. दरम्यान, पालिका आता विश्लेषण करत आहे, की कोणत्या वयोगटात सर्वाधिक संसर्ग झाला आहे. येत्या आठवड्यात पालिका सविस्तर अहवाल जाहीर करेल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पालिकेने तीनपेक्षा जास्त वेळा संक्रमित रुग्णांच्या नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले आहे. मागील जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात हे स्पष्ट झाले, की डेल्टा प्रकार ओमिक्रॉनने पूर्णपणे मागे टाकला आहे. ८ व्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये २८० कोविड रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी २४८ मुंबईकरांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे; तर डेल्टा डेरिव्हेटिव्ह ८ टक्के म्हणजे २१ नमुन्यांमध्ये आढळून आले आणि कोविडची लागण झालेल्या ११ मुंबईकरांमध्ये डेल्टा प्रकार आढळून आला.

सातव्या जीनोम सिक्वेन्सिंग अहवालात २८२ पैकी १५६ नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे; तर ९ व्या वेळी २८५ कोविडबाधितांच्या नमुन्यावर जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, रुग्णांची संख्या कमी असल्याने आता जीनोम सिक्वेन्सिंगचे नमुने कमी उपलब्ध होत आहेत. आता समुदायामध्ये जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेरो सर्वे लवकरच
हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन कामगारांमधील प्रतिपिंड पातळी तपासण्यासाठी, पालिका या महिन्याच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेरो-सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे. यासाठी, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे ३,००० नमुने गोळा केले जातील आणि अशा पद्धतीने सहा आणि नऊ महिन्यांच्या अंतराने सेरो सर्वेक्षण सुरू राहील.

प्रतिपिंडाची पातळी घसरली
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविडदरम्यान अनेक हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला संसर्ग झाला आणि त्यानंतर त्यांना पुन्हा संसर्ग झाला होता, ज्यामुळे त्यांच्या प्रतिपिंडाची (अॅन्टीबॉडी) पातळी घसरली होती. त्यामुळे, बूस्टरसह तीन डोस घेतल्यानंतरही सध्या ही पातळी समजून घेणे आवश्यक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top