
सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन
किन्हवली, ता. १५ (बातमीदार) ः कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शिवजयंती साजरी करताना गर्दी करू नये व शक्यतो सामाजिक उपक्रम राबवून साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन शहापूर पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी केले आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवी नियमावली तयार केली आहे. शिवजयंती साजरी करताना गर्दी करू नये व सामाजिक अंतर राखावे. तसेच शासकीय सूचनांचे पालन व्हावे, यासाठी शहापूर पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी हद्दीतील पोलिस ठाण्यांना सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटीच्या बैठका घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार
किन्हवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कमलाकर बच्छाव यांनी एक बैठक बोलवली होती. या वेळी शिवजयंती मंडळ सदस्यांना मार्गदर्शक सूचना देऊन शिवजयंती शक्यतो सामाजिक उपक्रम राबवून साजरी करा, असे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..