एपीएमसीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली

एपीएमसीत स्ट्रॉबेरीची आवक वाढली

Published on

वाशी, ता. १५ बातमीदार ः मुंबई कृषी उत्‍पन्न बाजार समितीमधील फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाजारात ४५०० क्रेट दाखल झाले असून यामध्ये ३००० क्रेट महाबळेश्वर, पाचगणी तर १ हजार ५०० क्रेट नाशिक येथून दाखल होत आहेत.
बाजारात साधारण डिसेंबरमध्ये स्ट्रॉबेरी आवक होण्यास सुरुवात होते. परंतु यंदा अवकाळी पावसाने सुरुवातीच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबला होता. डिसेंबरमध्ये २०० ते ३०० क्रेट दाखल झाली होती. ही आवक वाढून बाजारात आता ४५०० क्रेट स्ट्रॉबेरी दाखल होत आहे.
स्ट्रॉबेरी हे थंडीत पिकणारे फळ असल्याने त्याचा मुख्य बहर डिसेंबर, जानेवारी महिन्यांत असतो. हा बहर जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. मात्र अवकाळी पावसाने ऐन हंगाम उत्पादन फटका बसला होता. त्यामुळे आवक उशिराने झाली. आता उष्ण दमट हवामान असून बाजारात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात प्रतिकिलो स्ट्रॉबेरीला १६०-२८० रुपये बाजारभाव आहेत.

स्ट्रॉबेरीची आवक ४५०० क्रेट
भाव प्रतिकिलो १६० ते २८० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com