अनधिकृत बॅनर्सवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बॅनर्सवर कारवाई
अनधिकृत बॅनर्सवर कारवाई

अनधिकृत बॅनर्सवर कारवाई

sakal_logo
By

कल्याण, ता. २४ (बातमीदार) ः कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कायापालट अभियानाअंतर्गत बुधवारी पालिकेच्या पथकाने कल्याण-डोंबिवलीमधील विविध प्रभागांत असलेल्या अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्यात आली.
कल्याण पूर्वमधील सहायक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाने कल्याण पूर्वमधील कोळसेवाडी, गणेशवाडी परिसरातील एकूण ४२ बॅनर्सवर धडक कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त सविता हिले यांच्या पथकाने ड प्रभाग क्षेत्र कार्यालय ते विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसरात अनधिकृतपणे लावण्यात आलेले ३१ बॅनर्स हटवले. डोंबिवलीमधील सहायक आयुक्त किशोर शेळके यांच्या पथकाने डोंबिवली पूर्व, ९० फुटी रोड, घारडा सर्कल, कल्याण रोड या परिसरातील एकूण ७७ बॅनर्सवर कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top