अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार ? Political update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Badlapur municipal corporation
अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच

अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

अंबरनाथ : नवीन प्रभाग रचना (New ward structure) जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने (election commission) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना (Thane collector) दिल्यामुळे अंबरनाथसह बदलापूर नगरपालिकेच्या (Ambarnath badlapur municipal) निवडणुकाही लवकरच लागण्याची शक्यता आहे. कोरोना साथीमुळे मुदत संपूनही गेल्या दोन वर्षांपासून या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुका (election) रखडल्या आहेत. परिणामी येथे प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा: अभिनयाने नाही जमले, तरी मदतीने फुलवले चेहऱ्यावर हास्य!

एप्रिल २०२० मध्ये अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना संकटामुळे निवडणुका स्थगित करण्याची वेळ ओढावली. कोरोनाचा कहर कमी झाल्यावर पुन्हा फेब्रुवारी किंवा मार्च २०२१ मध्ये निवडणुका होण्याची अपेक्षा होती. मात्र मागील वर्षीही कोरोनाची दुसरी लाट आल्याने निवडणुका पुन्हा स्थगित करण्यात आल्या. या निवडणुकीसाठी मतदार याद्या निश्चित करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर निवडणुका होणार, अशी अपेक्षा असतानाच राज्य सरकारने पालिकेतील एक सदस्य पद्धत रद्द करून त्या ठिकाणी पॅनेल पद्धतीने निवडणुका घेण्याचा नवीन नियम लागू केला. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचना नव्याने करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली.

प्रशासनाने पुन्हा नियमात बदल करून प्रभागांची संख्या वाढविण्याबाबतही आदेश काढले. या सर्व गोंधळात अंबरनाथ पालिका प्रशासनाने वाढीव प्रभागांच्या संख्येसह प्रभाग रचना करून त्याला मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवले. या निर्णयामुळे पुन्हा प्रभाग रचनेला खीळ बसली आणि ही रचना जाहीर होण्याआधीच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नव्याने पुढे आला. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पुन्हा एकदा निवडणुका लांबणीवर पडल्या. ओबीसी आरक्षणाचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. असे असताना आता निवडणूक आयोगाने आरक्षणासाठी निवडणुकीची प्रक्रिया न थांबवता प्रभागरचना जाहीर करून त्याच संदर्भातील हरकती मागवण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

निवडणूक कार्यक्रम

अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १० मार्चला प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. १० ते १७ मार्च या कालावधीत त्यावर हरकती घेऊन २२ मार्चला या हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात होईल. १ एप्रिलला अंतिम प्रभागरचनेला मान्यता दिली जाईल, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाची समस्या संपुष्टात आल्यास प्रभागांचे आरक्षणाची सोडत देखील काढण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ पालिकेच्या निवडणुका एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :electionbadlapurambarnath
go to top