वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला

sakal_logo
By

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) ः भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील देहव्यापार करणाऱ्या महिलेवर चाकुचे वार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुजाहिद रहनुद्दीन शेख (वय २९) व अरबाज जावेद शेख (वय २४) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रेमनगर येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या पीडित महिलेकडे व्यवसाय करायचा असल्यास १५०० रुपये दे, अशी मागणी हे दोघे करत होते. पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी महिलेला शिवीगाळ करायला सुरुवात केली. यावेळी पीडितेच्या मैत्रिणीने मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी पीडितेला मारहाण करत तिच्या पोटावर चाकुने वार केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या परिसरात असे प्रकार सर्रास सुरू असून या ठिकाणी पोलिस गस्त नियमित सुरू ठेवून येथील सराईत गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी रामरहीम महिला मंडळाच्या अध्यक्षा राणी खान यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top