Pannkaj Dujodwala
Pannkaj Dujodwalasakal media

"चेहऱ्यावर हास्य आणि मनोबल कायम ठेवले तर कोणत्याही संकटावर मात करता येईल"

मुंबई : आयुष्यात संकटे ही येतातच, पण त्यावेळी तुम्ही ठामपणे त्याला कसे तोंड देता आणि तुम्ही कसे उभे राहता, हे महत्त्वाचे आहे. चेहऱ्यावर हास्य (Smile on face) आणि मनोबल कायम ठेवले तर तुम्हाला कोणत्याही संकटावर मात (courage for adversity) करता येईल, असा सल्ला ‘मंगलम कापूर’चे उत्पादक पंकज दुजोडवाला (Pannkaj Dujodwala) यांनी शुक्रवारी ‘यिन’ मंत्रिमंडळ अधिवेशनात (YIN Ministry) तरुणांना दिला.

Pannkaj Dujodwala
डबल डेकर बसमधून करा नवी मुंबई दर्शन; परिसराचा होणार कायापालट

व्यावसायिक असलेल्या दुजोडवाला यांनी व्यवसायातील अडचणी, प्रलोभने, मोह, व्यवसाय कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर व्यावसायिक म्हणून यशस्वी कसे व्हावे, संकटांवर मात कशी करावी, याचेही सल्ले त्यांनी दिले. आपण समाजाला काय देतो आणि काय देऊ शकतो, हे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही लोकांना जेवढे द्याल, तेवढेच उद्या लोक तुमच्या बरोबर येतील. तुम्ही लक्ष्य डोळ्यांपुढे ठेऊन वाटचाल केली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि नव्या पिढीलाही चांगली प्रेरणा द्याल. या दरम्यान आपल्या मनाचे संतुलन कायम ठेवा. संतुलन ढासळल्यास समस्या उद्‍भवतात, असेही त्यांनी सांगितले.

व्यवसायातील अडचणींबद्दल ते म्हणाले, नियमभंग करणारे लोक कधी ना कधी कायद्याच्या कचाट्यात सापडतातच, कारण अशा व्यक्तींना सरळ कसे करायचे, हे अधिकाऱ्यांना चांगलेच ठाऊक असते. पर्यावरण स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे काम असून मंत्री आदित्य ठाकरे सध्या पर्यावरणाच्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत. कापूर तयार करताना ३० किलोच्या पोत्यात केवळ एक किलो ‘हॅक्झामाईन’ नामक भेसळीचे रसायन मिसळले जाते. त्याने महिन्याचा नफा तब्बल ३५ लाखांनी वाढतो, परंतु आपण हा मोह निग्रहाने टाळला. त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित केल्यास कुठल्याही अडचणींना तोंड द्यायची वेळ येणार नाही, असेही ते म्हणाले.

कामात अडचणी जरूर येतात आणि त्या आल्याच पाहिजेत. कारण जीवनात जास्त गोडी झाली, तर डायबिटीस होतो. त्यामुळे गोडी मर्यादितच हवी, पण या अडचणींमुळे डगमगून जाऊ नका. संघर्षातूनच सकारात्मक दृष्टिकोन घेत पुढची वाटचाल करा. आपल्या मनात काही दोष नाही, असा आत्मविश्वास असला तर आपले कोणीही नुकसान करू शकत नाही, असे सांगताना त्यांनी आपल्यावर दडपण आणून आपल्याकडे पैसे मागायला आलेल्या माणसाचे उदाहरण दिले. त्याला युक्तीने धनादेश देण्याची तयारी दाखवून कसे सरळ केले हे उदाहरणही दुजोडवाला यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com