
ग्रामविकास करताना जनता जोडली जाते
मुंबई, ता. २६ : महाविद्यालयातून माझा हा प्रवास सुरू झाला होता. आता राजकारणातील सक्रिय व्यक्ती म्हणून मी काम करत आहे. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या स्तरावर शाश्वत विकास कसा साधता येईल यावर काम करणे आवश्यक आहे. गांधीजी नेहमी म्हणायचे की, खेड्याकडे चला. ही ग्रामसंस्कृती किती महत्त्वाची आहे हे काम करताना लक्षात येते. ग्रामविकासासाठी काम करत राहिल्यानंतर जनता आपोआप जोडली गेल्याचे ध्यानात आले, असे ‘यिन''च्या माजी मंत्री दिव्या भोसले यांनी सांगितले.
शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या सदस्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, बऱ्याचदा संधी मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते. अनुभवाच्या शिदोरीतून लोकांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आपल्या भूमीला, महाराष्ट्राला संतांनी घडवले आहे आणि आजचा युवा नेता उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहे, हे ‘यिन''च्या नव्या मंत्रिमंडळातील सदस्यांकडे पाहून वाटते, असा विश्वास दिव्या भोसले यांनी व्यक्त केला. आपण एकाच समाजाचे प्रतिनिधित्व करतो, समाजासाठी काम करत आहोत याचा विश्वास इथल्या प्रत्येकाला यिनमधून मिळणार असल्याचे त्या म्हणाल्या. नेतृत्व करणारे तेच असतात जे कोणालाही फॉलो करत नाही, नेतृत्व ते असते जे इतिहास घडवते आणि यिनचे सर्व सदस्य त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही त्या म्हणाला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..