
मुरबाडमधील एटीएम दरोड्याप्रकरणी आरोपींना तीन वर्षे कारावास
मुरबाड : मुरबाडमधील (Murbad) स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (SBI ATM Robbery) फोडून सुमारे ४५ लाख रुपये लंपास करणाऱ्या चौघांना (Four culprit punishment) मुरबाडच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी तीन वर्षे कारावासाची ( Three years imprisonment) शिक्षा सुनावली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर एक वर्षाच्या आतच न्यायालयाने निकाल दिला आहे.
हेही वाचा: पुणे : बसला लागलेली आग विझविताना अग्निशामक दलाचे प्रमुख अधिकारी जखमी
शहरातील स्टेट बँकेच्या एटीएममधून ४५ लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार बँकेच्या व्यवस्थापकांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार मुरबाडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, साह्यक उपनिरीक्षक रशीद तडवी आणि इतर अधिकारी कर्मचारी यांनी तपास करून नितीन चौधरी (२५), रमेश चौधरी (४०), सुरेश चौधरी (३६, सर्व रा. तुळई), नरेश मोरे (३२, रा. कळंभाड) यांना अटक केली.
त्यांनी चोरलेल्या ४५ लाखांपैकी ४२ लाख ६९ हजार ७०० रुपये हस्तगत केले होते. यामध्ये नितीन चौधरी याला तीन वर्ष कठोर कारावास व १० हजार रुपये दंड, नरेश मोरे व रमेश चौधरी यांना एक वर्ष कारावास व तीन हजार रुपये दंड, चौथा आरोपी सुरेश चौधरी याला ११ महिन्याची शिक्षा सुनावली; परंतु ही शिक्षा त्याने भोगली असल्याने त्याला सोडण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..