vasai-virar traffic
vasai-virar trafficsakal media

वसई-विरारमधील वाहतूक कोंडी फुटेना; प्रशासकीय राजवटीमुळे समस्यांकडे दुर्लक्ष

वसई : वसई-विरार (Vasai-virar) शहरात उड्डाणपुलाचे जाळे निर्माण करणार, वाहतूक व्यवस्था सुधारणार अशा वल्गना केल्या जात असल्या, तरी सद्यस्थितीत शहरात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला (Traffic jam issue) सामोरे जावे लागत आहे. पालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे नागरी समस्यांकडे हव्या त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नसल्याने याचा त्रास सर्वसामान्यांसह (Essential services) अत्यावश्यक सेवांनादेखील होत आहे.

vasai-virar traffic
नवी मुंबई : कमी किंमतीत सोने देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला पाच लाखांचा गंडा

पालिका क्षेत्रात महत्त्वाच्या मार्गालगत फेरीवाले मोकाट असून, पार्किंग व्यवस्था तोकडी आहे. त्यातच रुंदीकरण केलेल्या मार्गावरही रोजच कोंडी होते. दुचाकी, रिक्षा, चारचाकींसह अवजड वाहने व अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने या कोंडीत अडकत आहेत. तुळिंज, आचोळे मार्ग, मजेठिया, सोपारा गाव, नालासोपारा पश्चिम येथील स्काय वॉकजवळ, टाकी रोड यासह अन्य भागांत रोजच कोंडी होते. त्यातून वाट काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येतात; तर विरार, मनवेलपाडा पूर्वेकडील स्कायवॉकजवळचा परिसर, जीवदानी मार्ग, चंदनासार मार्ग, वसई-नवघर, सातिवली, गोखिवरे, वालीव, पेल्हार, वसई फाटा आदी मुख्य मार्गांवरही हीच परिस्थिती आहे. रोजच्या कोंडीने नागरिक त्रस्त झाले असून, या कोंडीतून मुक्तता करण्याची मागणी जोर धरत आहे.

वाहनतळाचा अभाव
वसई-विरार शहरात वाहनतळाचा अभाव आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने लावली जातात. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत असतो. जरी स्थानिक प्रशासन व वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असली, तरी काही कालावधीनंतर परिस्थिती पुन्हा जैसे थेच होते.

फेरीवाला क्षेत्र नसल्याने अडचण
पदपथ, रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले गेले आहेत. बाकडी, हातगाडीसह रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी फेरीवाले उभे असतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडसर येतो, परंतु फेरीवाला क्षेत्रासाठी धोरणात्मक अंमलबजावणी न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com