दिव्यात भाजप, राष्ट्रवादीला खिंडार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात भाजप, राष्ट्रवादीला खिंडार
दिव्यात भाजप, राष्ट्रवादीला खिंडार

दिव्यात भाजप, राष्ट्रवादीला खिंडार

sakal_logo
By

दिवा, ता. २८ (बातमीदार) : आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील भाजपसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. माजी उपमहापौर, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या व इतर शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत व ॲड. आदेश भगत आणि नीलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा भाजप मंडळाच्या मोर्चाचे नीलेश भोलानाथ पाटील यांच्यासह ६० पेक्षा अधिक पदाधिकारी व ४५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवा ब्लॉक कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवबंधन बांधले.
यावेळी भाजप युवा मोर्चा ठाणे शहराचे माजी सचिव, भाजप दिवा शहर उपाध्यक्ष, सचिव, भाजप शिक्षक आघाडी अध्यक्षा, १५ पेक्षा जास्त बूथ अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा अशा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दिव्यातील राष्ट्रवादीचे ब्लॉक कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्यासह त्यांचे एकूण ५२ कार्यकर्ते शिवबंध बांधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. सूर्यकांत कदम म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षात काम करीत असताना पक्ष श्रेष्ठींकडून योग्य असे प्रोत्साहन मिळत नव्हते. त्यातच आपापसात गटबाजीही जोरदार होती. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत होते. त्यामुळे संपूर्ण मरगळ आली होती; परंतु आता शिवसेनेत आल्यामुळे माझा पुनर्जन्मच झाल्यासारखे वाटत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..