Thur, March 23, 2023

मनोरीत वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर
मनोरीत वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर
Published on : 1 March 2022, 10:20 am
मालाड, ता. १ (बातमीदार) ः मनोरी येथील ज्ञानसाधना विद्यालयात सोमवारी (ता. २८) राष्ट्रीय विज्ञान आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठी गौरव गीत व विज्ञान गीत गायले. तसेच विविध वैज्ञानिक प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमादरम्यान घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. मुख्याध्यापक यशवंत पाटील आणि विश्वस्त रॉकी कोळी व सर्व शिक्षकवृंद याप्रसंगी उपस्थित होते.