Tue, March 21, 2023

समाजसेवक प्रकाश बोर्डे यांचे निधन
समाजसेवक प्रकाश बोर्डे यांचे निधन
Published on : 1 March 2022, 10:20 am
धारावी, ता. १ (बातमीदार) : मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश बोर्डे (वय ५२) यांचे सोमवारी (ता. २८) नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुंबईतील विविध झोपडपट्यांमध्ये समाजसेवा केली होती. सध्या ते स्लम रिहाबिलेशन सोसायटी या संस्थेत कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी व मुलगा असा परिवार आहे.