‘भाषेने भाकरीचा प्रश्न सोडवावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भाषेने भाकरीचा प्रश्न सोडवावा’
‘भाषेने भाकरीचा प्रश्न सोडवावा’

‘भाषेने भाकरीचा प्रश्न सोडवावा’

sakal_logo
By

मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः भाषेने भाकरीचा प्रश्न सोडवला तरच विद्यार्थ्यांना मराठी घेऊन बी. ए. करा, असे आपण सांगू शकतो. त्यासाठी अभ्यासक्रमाची मांडणी नव्याने करावी लागेल, असे मत लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला- वाणिज्य महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाने आयोजित केलेल्या मराठी राजभाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा करून महाविद्यालयाचा परिसर रंगीबेरंगी केला होता. या वेळी उपप्राचार्य सुभाष शिंदे, प्रा. नारायण बारसे, डॉ. अनिल ढवळे, प्रा.संतोष राणे, प्रा.शिशिर आंगणे, प्रा.राजश्री माने, प्रा.रूपेश महाडिक उपस्थित होते.