
मुंबईत ओमिक्रॉनची डोकेदुखी कायम, चाचणीतील निष्कर्ष वाचा
मुंबई, ता. २ : कोविड विषाणू जनुकीय निर्धारण सूत्र अंतर्गत मुंबईत नऊ चाचण्या करण्यात आल्या. कोरोना संसर्गाचा वेग कमालीचा मंदावल्याचे या अहवालातून समोर आले आहे. त्यात डेल्हा व्हेरिएंटही थंड झाला असला, तरी ओमिक्रॉनची डोकेदुखी कायम असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात असला तरी धोका अद्याप टळला नसल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध प्रकारातील कोविड विषाणूची होणारी लागण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयात ४ ऑगस्ट २०२१ मध्ये विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा सुरू केली. प्रयोगशाळेत दोन संयंत्र उपलब्ध आहेत. अमेरिकेतील ‘इलुम्निया’ या कंपनीने अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप या संस्थेच्या माध्यमातून एकूण सहा कोटी ४० लाख रुपये किमतीचे हे दोन जीनोम सिक्वेन्सिंग संयंत्र महापालिकेला दान स्वरूपात दिले आहेत. त्या माध्यमातून पालिकेने आतापर्यंत नऊ चाचण्या केल्या.
फेऱ्यांनुसार चाचण्या...
पहिली फेरी : ऑगस्ट २०२१
१८८ रुग्णांची तपासणी
१२८ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
२ रुग्ण ‘अल्फा’ने बाधित
२४ रुग्ण ‘केपा’ने बाधित
दुसरी फेरी : सप्टेंबर २०२१
३७६ रुग्णांची तपासणी
३०४ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
२ रुग्ण ‘नाईन्टीन-ए’ने बाधित
४ रुग्ण ‘व्हेन्टी-ए’ने बाधित
तिसरी फेरी : ऑक्टोबर २०२१
३४३ रुग्णांची तपासणी
१८५ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
११७ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
चौथी फेरी : नोव्हेंबर २०२१
२८१ रुग्णांची तपासणी
२१० रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
७१ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
पाचवी फेरी : डिसेंबर २०२१
२२१ रुग्णांची तपासणी
२४ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
१९५ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
२ रुग्ण ‘ओमिक्रॉन’ने बाधित
सहावी फेरी : १५ डिसेंबर २०२१
२९७ रुग्णांची तपासणी
१८३ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
१०५ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
७ रुग्ण ‘ओमिक्रॉन’ने बाधित
सातवी फेरी : ३१ डिसेंबर २०२१
२८२ रुग्णांची तपासणी
१५६ रुग्ण ‘ओमिक्रॉन’ने बाधित
८९ रुग्ण ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
३७ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
आठवी फेरी- जानेवारी २०२२
३७३ रुग्णांची तपासणी
२८० रुग्ण पालिका क्षेत्रातील
२४८ रुग्ण ‘ओमिक्रॉन’ने बाधित
२१ रुग्ण डेल्टा ‘डेरिव्हेटिव्ह’ने बाधित
११ रुग्ण इतर उपप्रकारांनी बाधित
२ रुग्ण ‘डेल्टा’ने बाधित
नववी फेरी : फेब्रुवारी २०२२
१९० रुग्णांची तपासणी
१८० रुग्ण ‘ओमिक्रॉन’ने बाधित
२३ रुग्णांचा यामध्ये मृत्यू
१५ जणांचे लसीकरणच नाही
चाचणीचा अहवाल
नमुने तपासणी : २,५२२
लसीकरण नाही : ५३३ (२१.१३ टक्के)
डेल्टा व्हेरिएंट : १,००७ (३९.९२ टक्के)
डेल्टा डेरिव्हेटिव्ह : ६७६ (२६.८० टक्के)
ओमिक्रॉन : ५९१ (२३.४३ टक्के)
इतर प्रकार : २४८ (९.८३ टक्के)
मृत्यू : ३१ (१.२२ टक्के)
लसीकरण : ८ (२५.८० टक्के)
लसीकरण नाही : २३ (७४.१९ टक्के)
चाचणीतील निष्कर्ष असा...
- कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचे कठोर पालन आवश्यक
- कोविड विषाणूच्या नवनवीन प्रकारांचा उगम
- वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करून उपचाराला वेग देणे शक्य
- डेल्टा व्हेरिएंट आणि डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणू तुलनेने सौम्य त्रासदायक
- डेल्टा डेरिव्हेटिव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण वेग कमी
- कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून संरक्षण मिळते
- लहान मुलांना कोविडची बाधा होण्याचे प्रमाण पूर्णपणे नियंत्रणात
सहाव्या चाचणीनंतर डेल्टाला उतरण...
कोविड विषाणू जनुकीय निर्धारण सूत्र अंतर्गत केलेल्या सहाव्या चाचणीत २९७ पैकी केवळ ७ (२ टक्के) रुग्ण ओमिक्रॉनबाधित होते. त्यानंतर मात्र ‘डेल्टा व्हेरिएन्ट’ ४ टक्क्यांपर्यंत कमी झाला; तर ओमिक्रॉनमध्ये ९४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. सातव्या फेरीमध्ये २८२ पैकी १५६ (५५ टक्के), आठव्या फेरीत २८० पैकी २४८ (८९ टक्के); तर नवव्या फेरीमध्ये १९० पैकी १८० (९४ टक्के) रुग्ण ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. त्यामुळे सध्या सापडत असलेले रुग्ण ओमिक्रॉन या उपप्रकारातील असल्याचे सिद्ध झाले आहे.
विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता आला. यामुळे पुढील नियोजन करण्यास तसेच उपचार पद्धती ठरवण्यास मदत झाली. यावरूनच कोरोना नियमावली बनवण्यात आली. योग्य माहितीमुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला. मृत्युदरही नियंत्रणात आणण्यात यश मिळाले.
- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..