युक्रेनमधील ९४ विद्यार्थी भारतात परतले

युक्रेनमधील ९४ विद्यार्थी भारतात परतले

Published on

ठाणे, ता. ४ : युक्रेनमध्ये ठाणे जिल्ह्यातील २५३ विद्यार्थी अडकून पडल्याची बाब पुढे आली आहे. ही जरी चिंतेची बाब असली तरी ९४ विद्यार्थी आतापर्यंत युक्रेनमधून मायदेशात परतले आहेत. त्यातील ५४ जण हे सुखरूपपणे आता आपापल्या घरी पोहोचले असल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली.

रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यातील काही जणांचा आकडा पुढे येत होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील आणखी काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत का, याची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनातर्फे सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी ०२२-२५३०१७४०/२५३८१८८६ या संपर्क क्रमांकावर आणि thaneddmo@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com