gold robbery
gold robberysakal media

भिवंडीत दोन भामट्यांनी वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेचं सोनं लुटलं; गुन्हा दाखल

भिवंडी : कुकसे बोरिवली गांव येथून भाजीपाला विक्रीसाठी भिवंडीत (Bhiwandi) येणाऱ्या वृद्धेचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी (Gold Robbery) लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील ठाणगे आळी येथील ठक्कर स्वीट रस्त्यावर ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल (police complaint filed) केला आहे. सुनिता देसले (५५) असे महिलेचे नाव आहे.

gold robbery
निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मदतीने शिवसेनेला दाखवून देऊ - रविंद्र चव्हाण

देसले या भाजीपाला विक्री करून घरी जात असताना ठाणगे आळी ठक्कर स्वीट समोरील रस्त्यावर दोघे भामटे आले. त्यांनी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे मणी असलेली माळ, कानातील सोन्याची कर्णफुले व कानातील सोन्याची साखळी असा एकूण ९५ हजारांचे दागिने चोरून नेले. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच महिलेने निजामपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com