डॉ. सुनिल धाकतोडे यांचे विक्रमी रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. सुनिल धाकतोडे यांचे विक्रमी रक्तदान
डॉ. सुनिल धाकतोडे यांचे विक्रमी रक्तदान

डॉ. सुनिल धाकतोडे यांचे विक्रमी रक्तदान

sakal_logo
By

भाईंदर, ता. ७ (बातमीदार) ः मिरा रोड येथे राहणारे डॉ. सुनील धाकतोडे यांनी विक्रमी रक्तदान केले आहे. त्याची नोंद जागतिक विक्रमांची नोंद असलेल्या इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
मिरा रोड येथील पूनम गार्डन परिसरात राहणारे डॉ. सुनील धाकतोडे यांनी विक्रमी १९८ वेळा रक्तदान केले आहे. डॉ. सुनील धाकतोडे हे मुंबईतील के.ई. एम. रुग्णालयात, ठाणे येथील रक्तानंद ग्रुप येथे नियमितपणे रक्तदान करत असतात. तसेच अनेक वेळा कोणत्याही रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास ते रक्तदान करत असतात. शिवाय ते नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती सुद्धा करत असतात. डॉ. धाकतोडे यांना राष्ट्रीय मिल मजदूर संघ तसेच अनेक सामाजिक संस्थांनी सन्मानित केले आहे. बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया या संस्थेने त्यांना आदर्श रक्तसेवक हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन तासगाव येथे सन्मानित केले होते. आता जागतिक विक्रमाच्या नोंदी असलेल्या इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने मिरा भाईंदर शहरातील अनेक संस्था व नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top