
दहावीच्या विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे मार्गदर्शन
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना ताणतणाव कसा दूर ठेवावा आणि अभ्यासाचे कसे नियोजन करावे, याबाबत विक्रोळीतील अग्रसेन विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट आणि कमलाबाई एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांचे तणावमुक्त परीक्षा देण्याविषयी लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट फेब्रुवारी महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशन वर्ग घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विक्रोळी पार्कसाईट हनुमाननगर येथील कमलाबाई एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या अग्रसेन हिंदी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (ता. ६) समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले होते. जवळपास ५० विद्यार्थी आणि लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रवीण काजरोळकर, शिक्षण सल्लागार शैलेश कसबे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..