रुपया सर्वकालिक नीचांकी स्तरावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुपया सर्वकालिक नीचांकी स्तरावर
रुपया सर्वकालिक नीचांकी स्तरावर

रुपया सर्वकालिक नीचांकी स्तरावर

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ (पीटीआय) : रशिया-युक्रेन युद्धामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोने, डॉलर आदी सुरक्षित साधनांची खरेदी सुरू केल्याने त्यांच्या दरात आज वाढ झाली; तर दुसरीकडे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.०१ अशा आतापर्यंतच्या सर्वकालिक नीचांकी स्तरावर गेला. कच्चे तेलाचे दर वाढल्याने लवकरच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्याही किमती वाढण्याची शक्यता आहे.

परकीय चलन बाजारात आज डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव ७६.८५ असा उघडला होता, मात्र नंतर तो घसरून ७७.०१ पर्यंत गेला. कालच्यापेक्षा तो ८४ पैशांनी घसरला. युद्धामुळे डॉलर, सोने आदी सुरक्षित साधनांची खरेदी गुंतवणूकदार करीत असल्याचे रॅलिगेअर ब्रोकिंगच्या सुगंधा सचदेवा यांनी सांगितले. लवकरच रुपया ७७.५० पर्यंत जाईल, तर मध्यम कालावधीत तो ७९ पर्यंतही कोसळू शकतो, असेही त्या म्हणाल्या. शेअरबाजारात, तसेच सर्वत्र परकीय गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेत असल्याने डॉलर, सोने महागत असून शेअरबाजार कोसळत चालला आहे.

सोन्याचा दर ५३ हजारांवर
नवी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट एक तोळे (१० ग्रॅम) सोन्याचा भाव १,२९८ रुपयांनी वाढून ५३,७८४ रुपयांवर पोहोचला. सोन्याचा दर काल ५२,४८६ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचे दर चढेच राहिले. चांदीचा भावही आज १,९१० रुपयांनी वाढून ७०,९७७ रुपयांवर गेला. काल हा भाव ६९,०६७ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचा भाव प्रति औंसाला १,९९६ अमेरिकी डॉलर एवढा झाला. चांदीचा दर औंसाला २५.८१ एवढाच राहिला.

कच्चे तेल १२५.८५ डॉलर
युद्धाच्या तणावामुळे आज कच्च्या तेलाचे भावही प्रति पिंपामागे १२५.८५ डॉलरपर्यंत वाढले. कालच्या तुलनेत त्यात आज ६.५५ टक्के वाढ झाली. या वाढीमुळे चलनवाढ आणि आयात-निर्यात व्यापारात तूट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top