मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांचा बळी ? BMC News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC
रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांचा बळी?

मुंबई : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांचा बळी ?

मुलुंड : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (Goregaon mulund combine road) आणि पुलाच्या रुंदीकरणासाठी पालिका तब्बल १२०० झाडे तोडणार (twelve hundred tree cutting) आहे अथवा त्यांचे स्थलांतर करणार आहे. पालिकेच्या (bmc) या निर्णयामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि मुलुंडकर नाराज आहेत. मुलुंडमधील पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा: डिझेल दर कमी करण्याबाबत लवकरच आदेश; शिष्टमंडळाला दिले आश्वासन

ते पुढे म्हणाले, की मुलुंडच्या पूर्व द्रुतगती मार्गावरून एलबीएस मार्गाला जोडणारा रस्ता हा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये खूपच हिरवळ आणि गवत पाहायला मिळते. येथील निसर्गरम्य परिसरामुळे उन्हाळ्यात अनेक वाटसरू येथील झाडाखाली आसरा घेतात. येथून मार्गक्रमण करणारे वाहनचालक विसावा घेऊन शांतपणे जेवताना दिसतात; मात्र येथील हिरवाई येणाऱ्या काळात नष्ट होणार आहे. याचे कारण म्हणजे गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता आणि पुलाच्या रुंदीकरणासाठी पालिका प्रशासन तब्बल १२०० झाडे तोडणार आहे अथवा त्यांचे स्थलांतर करणार आहे.

झाडांच्या सुरक्षिततेची ग्वाही द्या!

यासंदर्भात पालिका प्रशासनातर्फे तोडण्यात येणाऱ्या झाडांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचे रक्षण झाले तर मनुष्यप्राणी जगेल. पर्यावरणाची हानी केल्यास निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. या प्रकरणामध्ये राज्य सरकारने लक्ष घालून या भागामधील झाडे सुरक्षित राहतील अशी ग्वाही द्यावी; अन्यथा पर्यावरणप्रेमींच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल, असे मत मुलुंडकर व्यक्त करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsBMC