Gudi Padwa
Gudi Padwasakal media

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तनिष्कांची गुढी जल्लोषात

Published on

वसई : मुंबई, ठाणे व पालघरमध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का (sakal Tanishka) व्यासपीठाच्या महिला सदस्यांनी अत्यंत उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत (Gudi Padwa celebration) करत गुढी उभारली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यास बंदी होती. मात्र, यंदा आनंदाचा क्षण अनुभवताना येणाऱ्या नववर्षात विविध सामाजिक कार्याचा (social work) संकल्प ‘तनिष्का’च्या सदस्यांनी केला. बोईसरमध्ये नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून पुष्पा तिवारी यांच्या मार्गदर्शनात महिलांना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले.

Gudi Padwa
अलिबाग : घर खरेदी जोशात; जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार ?

यावेळी सामाजिक कार्याची दिशा काय असावी, यावर देखील चर्चा करण्यात आली. ठाणे जिल्हा व्यवस्थापक प्रकाश रामचंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मला कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण-डोंबिवली येथे तनिष्काकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला; तर भायखळा येथील बकरी अड्डा या ठिकाणी ‘तनिष्का’ व पालवी चॅरिटेबल अँड वेल्फेयर ट्रस्टच्या माध्यमातून स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारण्यात आली. यावेळी नववर्षाची भेटवस्तूदेखील उपस्थित महिलांना देण्यात आली. प्रज्ञा जाधव यांच्या मार्गदर्शनाने उद्योग, व्यवसाय वृद्धिंगत कसा करता येईल, याचे धडे नवीन वर्षानिमित्त देण्यात आले.

ठाणे येथील कल्पतरू सनराईज व तनिष्का महिलांनी एकत्र येत मोठ्या उत्साहात आकर्षक रांगोळी काढली. तसेच फुलांचे तोरण लावण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशभूषा करत महिलांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तसेच विरार येथे संगीता भेरे, स्नेहल गजरे, फरजाना शेख यांनी, तर अमरिता ढवळे यांनी वडाळा, कांदिवली येथे सोनल वसईकर या तनिष्का महिलांनी देखील नूतन वर्षाच्या निमित्ताने उपक्रम हाती घेतले होते.

डहाणू या ठिकाणी सदस्या आशा सुधाकर डाहाट यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी गुढीपाडवा साजरा करताना समाजकल्याणासाठी व पुढची पिढी सुदृढ राहावी म्हणून वृक्षारोपण व संवर्धन असा संकल्प केला. मधुरा भांगरे यांच्या नेतृत्वाखाली देखील भिवंडी येथे उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी महेश चौगुले यांनी महिलांनी उद्योग व्यवसायात पुढे जाण्यासाठी सदिच्छा दिल्या. तनिष्का महिला सदस्यांनी नववर्षाचे स्वागत करताना समाजहिताचे काम करण्यासाठी ‘सकाळ’ने दिलेले प्रोत्साहन व त्यामुळे मिळत असलेल्या प्रेरणेविषयी सांगताना सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरू ठेवणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Gudi Padwa
कोविडच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता; जम्बो केंद्र एप्रिलपर्यंत सुरूच

लेझीम ढोल-ताशांचा गजर

बोळिंज तनिष्का सदस्या सीमा काळे यांच्या नेतृत्वाखाली विरार येथे गुढी उभारून ‘वृक्ष लावू, आम्ही महिला सक्षम बनू’ ‘महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एकत्र लढू’ असा संकल्प केला. यावेळी ढोल-ताशा गजर करत लेझीम पथकाने देखील नवर्षाचे स्वागत शिस्तबद्ध पद्धतीने केले. नगरसेविका व तनिष्का सदस्यता अहुजा तरे यांनी देखील मोठ्या संख्येने महिलांना एकत्र आणत नवीन वर्ष साजरे केले.

भिवंडीत आमदारांची उपस्थिती

तनिष्काच्या सदस्या रोमा आळशी यांनी भिवंडीमध्ये आयोजित केलेल्या उपक्रमात आमदार महेश चौगुले, आमदार प्रतिभा पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली होती. याप्रसंगी उपस्थित महिलांना कडुलिंबाच्या रोपाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com