Tax Payment
Tax PaymentSakal Media

मालमत्ता कर ऑनलाईन भरल्यास सवलत; मिरा-भाईंदर पालिकेचा विचार

भाईंदर : मिरा-भाईंदर पालिकेत (Mira-Bhayandar Municipal corporation) सध्या ऑनलाईन कर (online tax) भरला किंवा तो लवकर भरला तर प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली नव्हती; परंतु नव्या आर्थिक वर्षापासून करदात्यांसाठी (Tax Payer) पालिकेने आनंदाची बातमी दिली आहे. करदात्यांनी आगामी मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा केल्यास त्यांना कर सवलत (Tax Discount) देण्यात येणार आहे. याशिवाय कराचे देयक मिळाल्यानंतर विशिष्ट मुदतीत तो भरला, तरीही करात सवलत देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. ही सवलत किती दिली जाणार, याचा निर्णय मात्र पालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे.

Tax Payment
अलिबाग : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यतत्परतेमुळे महिलचे प्राण वाचले

पालिकेच्या ऑनलाईन सेवांचा वापर जास्तीत जास्त व्हावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यातच नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात नागरिकांनीदेखील कर भरण्यासाठी पालिकेच्या मोबाईल ॲप, संकेतस्थळ आदी ऑनलाईन सेवांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३१ मार्चपर्यंत १६१ कोटी रुपये मालमत्ता कराची वसुली केली आहे. यातील तब्बल ५० कोटींहून अधिक रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली.

ऑनलाईन पद्धतीने कर भरणे पालिका प्रशासन आणि करदाते या दोघांसाठीही सोयीचे ठरत असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन कर भरण्यास प्रशासनाकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी वर्षभरात कधीही कराचा भरणा ऑनलाईन केला, तर करात ठराविक टक्के सवलत दिली जाणार आहे. सध्या ऑनलाईन कर भरल्यावर कोणतीही सवलत मिळत नाही; मात्र आगामी कराची देयके ऑनलाईन भरल्यानंतर ही सवलत प्राप्त होणार आहे.

Tax Payment
अलिबाग : चोरीप्रकरणी महिलेला एक वर्ष सश्रम कारावास

प्रामाणिक करदात्यांना दिलासा

१) महापालिका थकबाकीदारांकडून कर वसूल करण्यासाठी दर वर्षी अभय योजना राबवून व्याजात सूट देत असते; मात्र कराची देयके मिळाल्यानंतर तातडीने कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांना पालिकेकडून काहीच फायदा होत नाही. यामुळे अशा करदात्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे; मात्र प्रशासनाने आता अशा प्रामाणिक करदात्यांचाही विचार केला आहे.
२) जे करदाते देयके मिळाल्यानंतर एक महिन्याच्या किंवा दोन महिन्यांच्या आत कर भरतील, त्यांनाही त्या प्रमाणात करात सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे कर ऑनलाईन भरला आणि त्यातही तो विशिष्ट मुदतीत भरला तर करदात्यांना दुहेरी सवलत मिळणार आहे. लवकरच सवलतीचा हा प्रस्ताव सर्व साधारण सभेपुढे सादर करण्यात येणार आहे.

नागरिकांना करसवलत मिळत असेल, तर कराचा लवकर भरणा करतील. त्याचा महापालिकेलाही फायदा होईल आणि करदात्यांनाही ते फायदेशीर ठरणार आहे.
- संजय शिंदे, उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com