मुंबई : विमानतळ जागेवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन | Mumbai News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Slum
विमानतळ जागेवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन

मुंबई : विमानतळ जागेवरील झोपडीधारकांचे पुनर्वसन

मुंबई : चांदिवली परिसरात मिठी नदीकिनारच्या (Mithi river) विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील बाधित झोपडीधारकांना (slum) घरे देऊन त्यांचे पाडव्याच्या मुहूर्तावर पुनर्वसन करण्यात आले. गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. मिठी नदी शेजारील विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतिनगर, संदेशनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न चांदिवलीचे शिवसेना (shivsena) आमदार दिलीप लांडे (MLA Dilip lande) यांनी सोडविला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते या रहिवाशांचे पुनर्वसन एचडीआयएल संकुलात करण्यात आले.

हेही वाचा: मविआवरील टीकेनंतर नितीन गडकरी राज ठाकरेंच्या घरात; युतीची चर्चा जोरात

यासंदर्भात आमदार लांडे यांनी वारंवार पत्रव्यवहार करून तसेच विविध स्तरावर बैठक घेऊन पाठपुरावा केला, तसेच आंदोलनेही केली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला निर्वाणीचा इशारा देऊन लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे तत्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच झापोडीधारकांना प्रातिनिधिक स्वरूपात चाव्या वाटप करून पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केली होती. पाडव्याला ५१ झोपडीधारकांना सदनिका वाटप करण्यात आले.

प्रमाणावर जीवितहानी...

सन २००५ मध्ये मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्रांतिनगर, संदेशनगर, जरीमरी, बामनडायापाडा आदी विभागांत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. तत्कालीन शासनाने झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी सन २००८ मध्ये प्रीमियर कॉलनी इमारती बांधल्या; परंतु सदनिका देण्यात आल्या नसल्याने रहिवाशांचे दर पावसाळ्यात हाल सुरूच होते. त्यामुळे लांडे यांनी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करून हा प्रश्न सोडविला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..