ठाणे : शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए

ठाणे : शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए

शामकांत पतंगराव : सकाळ वृत्तसेवा
किन्हवली, ता. ४ : शेतातून बारमाही उत्पन्न मिळत नसल्याने घरची स्थिती तशी नाजूकच; मात्र तरीही शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करीत शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरात अतिदुर्गम खेडेगाव असणाऱ्या धोंडाळपाडा येथील जयेश तानाजी धानके या तरुणाने सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जयेश याने विद्यादान सहाय्यक मंडळाच्या सहकार्याने मिळवलेल्या प्रेरणादायी यशाचे ग्रामस्थ कौतुक करीत आहेत. (Thane Farmer's son shines in CA exam)

ठाणे : शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए
Job Tips: नोकरीच्या शोधात आहात का? या टिप्स मिळवून देतील उत्तम नोकरी

शेतकरी कुटुंबातील जयेश याचे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. धोंडाळपाडा शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मुरबाड येथील शिवळे कॉलेजमधून १२ वी वाणिज्य शाखेमधून ८२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ठाणे येथील बेडेकर कॉलेज गाठले. घरची स्थिती मध्यम असल्याने टिटवाळा येथे राहून शिक्षण घेताना जयेशला एक ना अनेक अडचणी आल्या; परंतु मनात जिद्द होती. उच्च शिक्षित बहीण अश्विनी हिने खासगी रुग्णालयामध्ये नर्सची नोकरी करून घर सांभाळले आणि भावाला उच्च शिक्षणासाठी मदत करून चार्टड अकाऊटंट होण्यासाठी प्रेरणा दिली. त्याने सीएचे शिक्षण द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया येथे पूर्ण केले; तर आर्टिकलशिप जठार अँड कंपनी यांच्याकडे पूर्ण केली. जयेशने फेब्रुवारी २०२२ मध्ये सीएच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आणि या परीक्षेत त्याने अत्यंत घवघवीत यश मिळवले. ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील असलेला न्यूनगंड बाजूला ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने आणि जिद्दीने मिळविलेले जयेशचे हे यश इतर युवकांसाठी प्रेरणादायी असेच आहे.

ठाणे : शेतकऱ्याचा मुलगा झाला सीए
Career News : कृषी अभियांत्रिकीमध्ये करा करिअर; असे आहेत पर्याय

कुटुंबाने दिली प्रेरणा
वडील तानाजी धानके, आई गुलाब धानके आणि बहीण अश्विनी धानके या कुटुंबातील सदस्यांनी वेळोवेळी प्रेरणा दिल्याने आणि वेळोवेळी केलेल्या विद्यादान मंडळाच्या सहाय्याने, बहिणीच्या मार्गदर्शनामुळे आपण यशस्वी झाल्याचे जयेश सांगतो. युवकांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते, असा मोलाचा सल्ला जयेश यांनी ग्रामीण भागातील तरुणांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com