
वसई : ३२० कोटींचा मालमत्ता कर वसूल; दोन हजार ६९७ मालमत्ता पालिकेने केल्या जप्त
वसई : वसई-विरार पालिकेकडून (Vasai-Virar Municipal corporation) यंदाच्या आर्थिक वर्षात तब्बल ३२० कोटी रुपयांचा मालमत्ता कर (Property tax) वसूल केला गेला आहे. गेल्या वर्षापेक्षा १०० कोटी अधिक कर (hundred crore tax) वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या तब्बल दोन हजार ६९७ मालमत्ता पालिकेने जप्त (Property seized) करत त्यांना दणका दिला आहे. पालिकेने जप्त केलेल्या मालमत्तांमधून ३० कोटींची वसुली होण्याची अपेक्षा मालमत्ता कर संकलन (Property tax department) विभागाला असल्याने ३५० कोटीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.
हेही वाचा: मुंबई : सहव्याधी, उशिरा रुग्ण दाखल झाल्याने कोरोना मृत्यूंत वाढ
कोरोनाच्या परिस्थितीनंतर पालिकेची आर्थिक स्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे पालिकेने थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी पालिकेने जनजागृती मोहीम राबवली होती. शहरात फलकदेखील लावण्यात आले. त्याचबरोबर ५०० चौमी निवासी मालमत्ताधारकांना शास्तीवर ५० टक्के सूट देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. त्यामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. मात्र, मोठे थकबाकीदार पुढे येत नसल्याने पालिकेने मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिका पथकाने मोठ्या थकबाकीदारांच्या दारी जाऊन जप्तीच्या नोटिसा बजावल्या.
कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणेवर अधिक खर्च करण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक तिजोरीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा कर वसुलीचे उद्दिष्ट अधिक ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी २२१ कोटी इतकी करवसुली करण्यात आली होती; तर यंदा यात १०० कोटीने वाढ झाली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे म्हणून करसंकलन विभागाचे उपायुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रत्येक प्रभागात दररोज होणाऱ्या वसुलीचा आढावा घेऊन तशा सूचना पथकाला करत होते. त्यामुळे मालमत्ता करवसुली अधिक झाली. शहरात लावलेल्या मोबाईल मनोरा चालकांकडूनदेखील महापालिकेला यंदा एकूण १४ कोटी ५७ लाख इतका महसूल मिळाला आहे.
वसुलीसाठी न्यायालयात धाव
वसई-विरार पालिकेने वाणिज्य, औद्योगिक, निवासी करदाते कर भरत नसल्याने न्यायालयातदेखील धाव घेतली होती. एकूण चार हजार दावे प्रशासनाकडून वसई लोकन्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिक पुढे आले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..