वाड्यात बहरली टरबूज शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात बहरली टरबूज शेती
वाड्यात बहरली टरबूज शेती

वाड्यात बहरली टरबूज शेती

sakal_logo
By

वाडा, ता. ७ (बातमीदार) ः अवकळी पाऊस, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीवर मात करत तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी भाताला पूरक व्यवसाय म्हणून टरबुजाचे उत्पादन घेत आहेत. यंदा तालुक्यातील सांगे येथील शेतकरी अनिल पाटील यांनी टरबूज शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. टरबुजाचे उत्पन्न भरघोस आल्याने त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
वाडा तालुका भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. वाडा कोलम हे भाताचे वाण प्रसिद्ध असून बाजारपेठेत हा तांदूळ हातोहात संपतो; परंतु वाढत्या महागाई, मजुरांची कमतरता, इंधनाचे वाढलेले दर, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक अडचणी येत असल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेती सुरू केली आहे. फळ, फूल, भाजीपाला अशी अनेक उत्पादने घेऊन ते शेतीत नवनवीन प्रयोग करू पाहत आहेत. असाच एक प्रयोग सांगे येथील शेतकरी अनिल पाटील यांनी केला आहे. त्यांनी आपल्या सहा एकर जागेत टरबूज शेती केली आहे. याअगोदर त्यांनी पिवळ्या हिरव्या रंगाची कलिंगड शेती करून त्याचेही विक्रमी उत्पादन घेऊन ही शेतीही यशस्वी केली आहे.
अनिल पाटील यांनी संपूर्ण शेती ठिबक सिंचन करून केली आहे. टरबुजाच्या नोनिवो कंपनीच्या कुंदन जातीच्या वाणाच्या टरबुजाची लागवड केली आहे. लागवडीपासून ६० दिवसांत हे पीक तयार झाले. मल्चिंग आणि ठिबक पद्धतीने केल्याने मनुष्यबळ कमी लागते आणि पाणी, औषधे ही ठिबकमधूनच दिली जात असल्याचे पाटील यांनी सांगितले. एक टरबूज एक ते दीड किलो वजनापर्यंत जात असून एका किलोत एकच नग बसतो. एकराला सव्वा लाखाच्या आसपास खर्च येत असून एकरी पाच लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा पाटील यांना आहे.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळावे. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आधुनिक शेतीची कास धरावी. नोकरीपेक्षा जास्त पैसा या क्षेत्रात मिळतो.
- अनिल पाटील, शेतकरी.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..