Accident possibilities
Accident possibilitiesSakal Media

पनवेलचे गतिरोधक अपघात प्रवण क्षेत्र! प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी

नवीन पनवेल : पनवेल महापालिका (Panvel Municipal corporation) क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे गतिरोधक (Speed Breaker) बनवण्यात आले आहेत. त्यावर झेब्रा आणि पांढरे पट्टे नसल्याने अपघात (Accidents) होत आहेत. यात काही जणांनी प्राणही गमावला आहे. अशा दुर्घटनांकडे सिडको (cidco) आणि महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Accident possibilities
भाईंदर : खासगी रुग्णालयांकडून कोट्यावधींचा घोटाळा ?

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेलसह नवीन पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नावडे या सिडको वसाहती आहेत. या ठिकाणी शेकडो किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते आहेत. सिडकोने या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले नाही. पनवेल महापालिकेकडे रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. आगामी काळामध्ये या रस्त्यांची देखभाल, डागडुजीची जबाबदारी ही पालिकेकडे असणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांवर सिडकोने अनेक ठिकाणी गतिरोधक तयार केले आहेत. त्यांची उंची जास्त असल्याने अनेकदा अपघात घडतात. त्याचबरोबर या गतिरोधकांवर झेब्रा किंवा पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. अनेकदा पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी गतिरोधक न दिसल्याने वाहने त्यावर आपटतात. कित्येकदा चारचाकी वाहनचालकांचा ताबा सुटून अपघातही घडलेले आहेत. त्याचबरोबर दुचाकी घसरण्याच्या घटनाही घडतात. याबाबत सिडकोकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांच्याकडून उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

Accident possibilities
आकसापोटी केंद्रीय यंत्रणांचा वापर लोकशाहीला घातक - एकनाथ शिंदे

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व गतिरोधकांवर पांढरे किंवा झेब्रा पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष दौलत शिंदे यांनी केली आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावरील गतिरोधकावरही पट्टे मारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना पत्र देणार असल्याचे दौलत शिंदे यांनी सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रात जवळपास ५०० ते ६०० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते आहेत. सिडकोने या ठिकाणी अनेक ठिकाणी गतिरोधक बसवले आहेत. त्यांच्या उंचीचा तांत्रिकदृष्ट्या विचार केला नसल्याने अनेकदा वाहने जोरात आढळतात. रात्रीच्या वेळी अपघातही घडतात. हे अत्यंत धोकादायक असून येथे झेब्रा किंवा पांढरे पट्टे मारण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार पालिकेकडे पाठपुरावा करत आहे.
- दौलत शिंदे, उपाध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com