मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहने उभी

मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहने उभी

Published on

खारघर, ता. १० (बातमीदार) : खारघर सेक्टर १९, सेक्टर ३४ आणि ३५ मधील मेट्रो पुलाखाली दोन्ही बाजूला अनधिकृतपणे वाहने उभी केली जात असल्यामुळे रस्त्याला वाहनतळाचे रूप आले आहे. खारघर वाहतूक पोलिस आणि प्रभाग कार्यालय या बेकायदा पार्किंगकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर सेक्टर १९ मधील रिलायन्स फ्रेश मॉलकडून रामशेठ पब्लिक स्कूलकडे जाणाऱ्या आणि सेक्टर २७ एनएमआयएमएस महाविद्यालयाकडून सेक्टर ३५ कडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली सिडकोने रस्त्याच्या दोन्ही बाजूने तीन लेन तयार केले आहे. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दुकाने, हॉटेल तसेच बँक आहे. दुकान मालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. याशिवाय जवळपास राहणाऱ्या नागरिकांची वाहने, तर काही जण टूर्सच्या गाड्याही आणि अवजड वाहने मेट्रो पुलाखाली उभी केलेली जातात. त्‍यामुळे तीनपैकी केवळ एकच लेन वाहनचालकांसाठी उपलब्ध असते.
याच रस्त्यावरून दिवसभर खारघर, तळोजा, ठाणे, मुंब्रा आणि नावडे परिसरातील खासगी वाहने; तसेच एनएमएमटीच्या बसेस धावतात. त्यामुळे एकेरी लेनवरून वाहन चालवताना चालकांची दमछाक होते. याशिवाय, नागरिकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खारघर वाहतूक विभागाने अनधिकृत वाहन पार्किंगवर कारवाई करून मेट्रो पुलाखालील रस्ता खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कोट -
मेट्रो पुलाखाली अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई केली जाते. तसेच अन्य उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसाने कारवाई करावी, असे पत्र पाठवले जाईल.
- जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर

मेट्रो पुलाखालील रस्त्यांची पाहणी केली जाईल. बेकायदा वाहने उभी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
- योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर

वाहने दुरुस्तीचे कामे
सेक्टर ३४ मेट्रो पुलाखालील रस्त्यावर गॅरेज व्यावसायिक अनेक दिवसांपासून रस्त्यावरच वाहने उभी करून दुरुस्तीचे काम करत असतात. रस्त्यावर वाहने दुरुस्ती केली जात असल्यामुळे वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com