Corona Center
Corona Centersakal media

रायगड : आठवडाभरात कोरोनाचे १० पेक्षा कमी रुग्ण; कोविड केंद्रे अखेर बंद

अलिबाग : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) रायगड (raigad) जिल्ह्यातील कोविड केअर केंद्रात (corona care center) खाटा अपुऱ्या पडत होत्या. ही परिस्थिती आता सुधारली असून जिल्ह्यात आठवडाभरात कोरोनाचे १० पेक्षा कमी रुग्ण (corona patients) सापडत आहेत. यामुळे सर्व २० कोविड केंद्रे बंद करण्यात आली असून या ठिकाणी जनरल वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आता अवघे ४३ कोरोनाबाधित आहेत.

Corona Center
मनुष्य जीवनात वाचनाचे खूप महत्व; पुस्तकामुळेच जीवन आनंदी

मागील वर्षी दुसऱ्या लाटेत प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केंद्रे सुरू करण्यात आली होती. त्या वेळी अलिबाग येथे जिजामाता रुग्णालयातील केंद्राची क्षमता कमी पडत होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचे कोविड केंद्र सुरू करून अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. आता रायगड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना ही केंद्रे बंद करून तेथे नियमित दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष, डायलिसिस सेंटर, नेत्र शस्त्रक्रिया रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. या ठिकाणी जिल्हाभरातील रुग्ण चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा घेत आहेत. जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवेचे समाधानकारक चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व १८ आणि शहरी भागातील दोन अशी २० कोविड केंद्रे बंद करण्यात आली आहेत.

Corona Center
कल्याण : आयपीएल सट्टा; १३ जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

दुसऱ्या लाटेत रुग्णांचे हाल

कोरोनाच्या पहिल्या कोरोना लाटेपासून दूर असणारा रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत सापडला. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. गेल्या वर्षी मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्याने मोठी धावपळ करावी लागली. रुग्णालयात खाटाही शोधाव्या लागत होत्या. काही रुग्णांना तर स्वच्छतागृहांच्या प्रवेशद्वासमोर उपचार घेण्याची वेळ आली होती. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने जिल्हा प्रशासन जागे झाले होते. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून जिल्हा रुग्णालयात १०० खाटांचे कोविड केअर सुरू केले होते.

बुधवारी एकही रुग्ण नाही

कोरोना लाटा शिखरावर असताना एका दिवसाला दोन हजार ६५३ पर्यंत रुग्ण रायगड जिल्ह्यात सापडत होते. आता परिस्थितीत मोठी सुधारणा झाली असून बुधवारी एकाही नवीन रुग्णाची भर पडली नाही. सध्या कोरोनाचे अवघे ४३ रुग्ण असून ते सर्व गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने येथील कोविड केअर केंद्रे बंद करून तिथे जनरल वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी चांगल्या दर्जाची उपचार सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे उपचारासाठी मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्याची आवश्‍यकता नाही.
- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक

सहा महिन्यांपूर्वी आरोग्य क्षमता
जनरल वॉर्ड - ३,५१३
ऑक्सिजन खाटा - २,५७५
आयसीयू खाटा- ६४०
व्हेंटिलेटर - २६२

लसीकरणावर दृष्टिक्षेप

पहिला मात्रा - २२,०५,२१०
दुसरा मात्रा- २०,२५,३८६
६० च्या पुढील- ९,१३,४९३
४५-६० मधील- २५,०२,४०४
१८-४४ मधील - १,६८,४००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com