नवी मुंबई : तुर्भे MIDC परिसरात आढळला रूका साप | common bronzeback tree snake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

common bronzeback tree snake
रूका साप सापडला

नवी मुंबई : तुर्भे MIDC परिसरात आढळला रूका साप

घणसोली : तुर्भे एमआयडीसी (Turbhe MIDC) परिसरात मंगळवारी रूका साप (common bronzeback tree snake) आढळला. घणसोलीतील सुरेश खरात या सर्पमित्राने या सापाला पकडून वनक्षेत्र अधिकाऱ्यांकडे (forest department) सुपूर्द केले. तुर्भे एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान कोलाज प्रा. लिमिटेड या कंपनीच्या आवारात एक साप असल्याची माहिती दिगंबर कोहळे या रहिवाशाने सर्पमित्र खरात (Suresh kharat) यांना कळविले होते.

हेही वाचा: नवी मुंबई : एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करणारी टोळी गजाआड

खरात यांनी तातडीने एमआयडीसीत धाव घेत रूका सापाला पकडले. हा साप दक्षिण भारत आणि हिमालयाच्या पायथ्याशी आढळतो. तो बिनविषारी असून जमिनी आणि झाडांवरही जलद धावतो. उन्हाच्या तडाख्यामुळे साप बिळातून बाहेर येतात. यामुळे सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Navi Mumbaisnake