थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा
थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : मागील आर्थिक वर्ष संपले असले करी यंदाच्या आर्थिक वर्षात कर वसुलीचे सुयोग्य नियोजन करून अधिकाधिक कर वसुली करण्याचे निर्देश पालिका आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले आहेत. तसेच थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही सर्व कर निरीक्षकांना यात देण्यात आले.

कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत मागील वर्षातील करवसुली आणि या वर्षातील कर वसुलीचे नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुली याकडे दुर्लक्ष न करता अधिकाधिक कर वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजनाचे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले आहेत.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात ३१ मार्चअखेरपर्यंत ६१३.९२ कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभाग समितीनिहाय वेळेत बिले छपाईसाठी देऊन २६ तारखेपर्यंत ९० टक्के बिलांचे वितरण करून वसुली करावी, शहरातील एकही थकबाकीदार शिल्लक न ठेवता १५ मे पर्यंत त्यांच्यावर धडक कारवाई करण्याचे निर्देशही हेरवाडे यांनी यावेळी दिले. याशिवाय ज्यांचे धनादेश वठलेले नाहीत त्यांना एप्रिलपर्यंत मुदत देऊन ते वठवून घ्यावेत, अन्यथा मे महिन्यात संबंधित थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देशही त्यांनी दिले.

कर आकारणी प्रमाणपत्र एप्रिल अखेर
नवीन मालमत्तांची कर आकारणी करून तसे प्रमाणपत्र संबंधित कर निरीक्षकांनी एप्रिल महिन्याअखेर सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर हौसिंग सोसायट्यांना स्वतंत्र देयके वितरित करणे, ५०० चौ. फूट क्षेत्रफळ असणाऱ्या मालमत्ताच्या नोंदी तात्काळ पूर्ण करणे, तुटलेल्या मालमत्तांची मागणी डिमांडमधून कमी करणे, तसेच वापरात बदल किंवा अनिवासी भाडेतत्त्वावरील कर आकारणीची कार्यवाहीही करण्याच्या सूचना हेरवाडे यांनी दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..