वसईकरांचा मुंबई प्रवास अधिक वेगवान; उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास | MMRDA News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MMRDA
वसईकरांचा मुंबई प्रवास अधिक वेगवान

वसईकरांचा मुंबई प्रवास अधिक वेगवान; उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास

वसई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नायगाव खाडी (Naigaon creek) व रेल्वेस्थानकावरील उड्डाणपुलाचे (Railway Flyover) काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या उड्डाणपुलाचे काम एमएमआरडीएने (MMRDA) हाती घेतले होते. गेल्या ७ वर्षांपासून नागरिक या उड्डाणपुलाची प्रतीक्षा करत होते. अखेर हा उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यामुळे नायगाव पूर्व-पश्‍चिम, वसईतील नागरिकांसह मुंबईकडे (Mumbai) येणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास वेगवान होईल.

हेही वाचा: ST Strike : ''आंदोलनाआधी पवारांच्या घराची रेकी करण्यात आली''

नायगाव पूर्वेकडील लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना पश्चिमेकडे येण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याने महामार्गावरून ये-जा करावी लागत होती किंवा रेल्वेशिवाय पर्याय नव्हता. वसई व नायगावदरम्यान ये-जा करण्यासाठी नागरिकांना महामार्गावरून वळसा घालावा लागत होता. अशावेळी अत्यावश्यक सेवांना देखील फटका बसत होता. वसईतील नागरिकांना महामार्गावर जाण्यासाठी अंबाडी, सातिवली अथवा वालीव या मार्गांचा अवलंब करावा लागत होता.

त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर एमएमआरडीएने २०१५ मध्ये याचे काम हाती घेतले. अखेर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. उड्डाणपुलाचे गर्डर, काँक्रीटीकरण, कठडा, अन्य बांधकाम, डांबरीकरण अशी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. नायगाव पूर्व-पश्चिम पुलाची निर्मिती करण्यात आल्याने रुग्ण, व्यापारी, चाकरमानी, अत्यावश्यक सेवेतील वाहने यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी नवा पर्याय निर्माण झाला आहे. शिवाय वेळ व इंधनाची बचत होणार आहे. जूचंद्र, परेरा नगर, अमोल नगर, बापाणे, चंद्रपाडा यासह नायगाव व वसई पश्चिम भागातील नागरिकांना या पुलाचा फायदा होणार आहे.

हेही वाचा: सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

नायगाव उड्डाणपुलाचा आढावा

कामाला सुरुवात - २०१५
लांबी - १. २९ किलोमीटर
रुंदी - १२ मीटर
खर्च - १०८ कोटी

मार्गाचे मोजमाप

नायगाव पश्‍चिम : लांबी २५२ मीटर, रुंदी ६.५ मीटर
उमळे गाव : ४५६ मीटर, रुंदी १२ मीटर
नायगाव पूर्व : ६४४ मीटर, रुंदी १२ मीटर

पुलाचे फायदे

नायगाव पूर्व, पश्‍चिम, वसई, उमेळे, जूचंद्र या भागातील स्थानिकांना उड्डाणुलाचा फायदा होईल.
अंदाजे १२ ते १५ किलोमीटरचा वळसा वाचणार, २५ ते ३० मिनिटांची शिवाय इंधनाचीही बचत

श्रेयवादाची लढाई रंगणार

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर व लोकप्रतिनिधींनी नायगाव पूर्व-पश्चिम उड्डाणपुलासाठी एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला; तर शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने हा पूल झाल्याचे वसई तालुकाप्रमुख नीलेश तेंडोलकर यांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे या पुलावरून राजकीय श्रेयाची लढाई सुरू झाल्याने उद्‌घाटन कोण करणार, याकडे लक्ष लागले आहे.

वाहतुकीविषयी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर व सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, लवकरच हा पूल रहदारीसाठी खुला करण्यात येणार आहे.
- प्रवीण शेट्टी, माजी महापौर.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..