शरीर सौष्ठवपटूने उंचावली पोलिस विभागाची मान

शरीर सौष्ठवपटूने उंचावली पोलिस विभागाची मान

प्रमोद जाधव ः अलिबाग
शरीर सुदृढ ठेवण्यासाठी वडिलांकडून मिळालेले बालकडू, कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे रायगड जिल्हा पोलिस दलातील राजेंद्र गाणार यांनी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले. गाणार हे सध्या वाहतूक विभागात कार्यरत आहेत. त्यांनी ‘अलिबाग श्री’पासून ‘ऑल इंडिया’ स्पर्धेपर्यंत यशाचा आलेख उंचावला आहे. या ध्येयवेड्याने सुदृढ आरोग्याचा मंत्र देत पोलिस विभागातील अनेकांचे आरोग्य सुधारण्यास मोलाची मदत केली आहे.

गाणार हे मूळचे रायगड जिल्ह्यातील मुरूड-जंजिरा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील सुदृढ शरीरासाठी नियमित व्यायाम करीत होते. वडिलांनी दिलेले हे बाळकडू १६ व्या वर्षांपासून जपण्यास सुरुवात केली. या सुदृढ आरोग्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते पोलिस विभागात भरती झाले. दिघी सागरी पोलिस ठाणे,  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नाईक म्हणून काम केले. पोलिस म्हणून कर्तव्य बजावत असताना, व्यायामशाळेत जाण्यास वेळ मिळत नव्हता. त्यावर मात करीत त्यांनी कधी रात्री एक वाजता, तर कधी पहाटे साडेपाच वाजता वेळ मिळेल त्या पद्धतीने व्यायाम केला. त्यामध्ये सचिन पाटील, प्रशांत कावजी, संजय उले यांसारख्या शरीरसौष्ठवमधील जाणकारांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांनी नंतर शरीरसौष्ठव स्पर्धां सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे कसरत करण्याबरोबरच खाण्यापिण्यावर लक्ष दिले. गाणार यांची नंतर वाहतूक शाखेत बदली झाली, सध्या ते नागोठणे ठाण्यात कार्यरत आहेत. रात्री ड्यूटी आटोपून आल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारला उठणे, साडेपाच ते आठ वाजेपर्यंत व्यायाम शाळेत जाणे. त्यानंतर नऊ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर होणे, असा त्यांनी दिनक्रम ठेवला आहे. त्यांच्या चांगल्या खाण्यापिण्याची व्यवस्था पत्नी पाहते.

 वडिलांकडून  व्यायामाचे बाळकडू मिळाले. आता एक ‘करिअर’ म्हणून पाहतो.  शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचे एक स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. २०२० मध्ये अलिबाग ‘श्री टायटल’ पारितोषिक पटकावले. त्यानंतर २६ जानेवारीला ‘रायगड श्री’मध्ये दुसरा क्रमांक, त्यानंतर खारेपाट श्रीमध्ये तिसरा क्रमांक, मुरूडमध्ये ‘रायगड श्री’ विजेता,  तसेच २०२१ मध्ये ‘ऑल इंडिया’साठी निवड झाली. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलिसांची नक्कीच मान उंचावली आहे.
........................
पोलिस विभागात काम करीत असताना सुरुवातीला व्यायामासाठी वेळ मिळत नव्हता; परंतु या क्षेत्रात एक वेगळे  अस्तित्व निर्माण करण्याची आवड निर्माण झाली आहे. वडिलांची शिकवण यासाठी मार्गदर्शक ठरली. नोकरीमुळे व्यायामात खंड पडू नये याची काळजी नेहमी घेतो. त्यामुळे या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तरुणांनी शरीर सुदृढ ठेवण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
 - राजेंद्र गाणार, पोलिस नाईक, वाहतूक विभाग.
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com