
गाडीवर भोंगा लावत मनसेचे हनुमान चालिसा पठण
प्रभादेवी, ता. १० (बातमीदार) : रामनवमीनिमित्त रविवारी गाडीवर भोंगा लावून श्रीरामाची गाणी आणि हनुमान चालिसा पठण करून मनसेने नागरिकांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. भोंगा लावलेली गाडी शिवसेना भवन परिसरातून फिरवण्यात आली.
मनसेने श्रीरामाचे मोठे फलक लावून गाडी सजवली होती. त्यावर भोंगा लावून रामाची गाणी वाजवण्यात येत होती. विशेष म्हणजे शिवसेना भवनाजवळून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली. हिंदूंचे सर्व सण मोठ्या दिमाखात साजरे करता यावेत यासाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली रथ फिरवण्यात आला. हनुमान चालिसा लावली म्हणून इतका राग का? जे हिंदुत्व विसरले आहेत त्यांना जागे करण्यासाठी आरतीचा रथ आम्ही फिरवत आहोत, असे किल्लेदार यांनी सांगितले. दादर परिसरातून फिरणाऱ्या गाडीवरील भोंगा पोलिसांनी जप्त करून दांडात्मक कारवाई करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..